शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर आरोपांनंतर मेघालयच्या राज्यपालांचा राजीनामा

By admin | Updated: January 27, 2017 05:57 IST

मेघालयचे राज्यपाल व्ही. शनमुगनाथन यांनी गुरूवारी रात्री राजीनामा दिला. राजभवनाचं रूपांतर तरूणींच्या क्लबमध्ये झालं आहे ''असा गंभीर आरोप...

ऑनलाइन लोकमत
शिल्लॉंग, दि. 27- मेघालयचे राज्यपाल व्ही. शनमुगनाथन यांनी गुरूवारी रात्री राजीनामा दिला. राजभवनमध्ये काम करणा-या अनेक कर्मचा-यांनी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनात पत्र पाठवून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यांच्यावर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 
 
''राज्यपालांमुळे राजभवनाची प्रतिष्ठा आणि कर्मचा-यांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे.  राजभवनाचं रूपांतर तरूणींच्या क्लबमध्ये झालं आहे ''असा गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ हटवण्यात यावं अशी मागणी राजभवनातील जवळपास 100 कर्मचा-यांनी केली होती.
 
शनमुगनाथन यांच्या आरोपांबाबत पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्रालयाच्या निर्णयाची वाटट पाहात आहे असं मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा म्हणाले होते. मात्र, तीव्र होणारा विरोध पाहता शनमुगनाथन राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. काम मागायला आलेल्या एका महिलेवर  लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापुर्वी शनमुगनाथन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते पण वाढत्या विरोधामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. 
 
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ज्योती प्रसाद राजखोवा यांना हटवल्यानंतर  संगमुंगनाथन यांनी राज्यापालपदाचा कार्यभार सांभाळला होता.