शिलाँग : मेघालयच्या गारो डोंगराळ भागात असलेल्या चिओकग्रे येथे पाच सशस्त्र दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी ठार केले. पोलीस महासंचालक जे. पी. हनामान यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एका घरात यूएएलएचे दहशतवादी दबा धरून बसल्याची गुप्तचर विभागाने माहिती दिली होती. यानुसार राज्य पोलीस व सीआरपीएफच्या कोब्रा पथकाने ही कारवाई केली. यात पाच दहशतवादी ठार झाले, तर त्यांचा प्रमुख नोरोक हा अंधाराचा फायदा उचलून पळून गेला. मागील वर्षी आसामच्या गोलपाडा भागात सात नागरिकांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी या ठिकाणाहून तीन रायफल्स व एक पिस्तूल जप्त केले आहे. (वृत्तसंस्था)
मेघालयमध्ये पाच दहशतवाद्यांना टिपले
By admin | Updated: May 21, 2014 02:11 IST