महिला सल्लागार समितीची १६ ला बैठक
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
नागपूर: महिलांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी दु. १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महिला सल्लागार समितीची १६ ला बैठक
नागपूर: महिलांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी दु. १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. शहरातील वारांगनांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना, तृतीय पंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण, महिलांवर अत्याचार, हुंडा पद्धतीचे निर्मूलन, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत सुटका झालेल्या महिलांचे पुनर्वसन प्रकरणांचा आढावा, कौटुंबिक प्रतिबंध अधिनियम आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीला नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती, जिल्हा सरकारी वकील, सामाजिक न्याय खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)