शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सागर पार्क प्रकरणी पोलीस मनपा प्रशासनात होणार बैठक

By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST

जळगाव : सागर पार्कवरील हॉकर्सने गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन जागेच्या विषयावर निर्णय घेण्याची मागणी केली. या विषयावर आता महापालिका शुक्रवारी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार याप्रकश्नी एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्याविषयी पत्र देणार आहे.

जळगाव : सागर पार्कवरील हॉकर्सने गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन जागेच्या विषयावर निर्णय घेण्याची मागणी केली. या विषयावर आता महापालिका शुक्रवारी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार याप्रकश्नी एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्याविषयी पत्र देणार आहे.
सोमवारपासून सागरपार्कवर हॉकर्सने खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्या लावल्या होत्या. दोन दिवस या गाड्या तेथे होत्या. मात्र शुक्रवारी पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्तांमध्ये झालेल्या चर्चेनंतर रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले हे सागर पार्कवर पोहोचले. त्याच वेळी अतिक्रमण विभागाचे पथकही तेथे गेले. या ठिकाणी हॉकर्सने काही काळ कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन केले होते. मात्र पोलिसांच्या सूचनेनंतर तेथे असलेल्या २० ते २२ खाद्य पदार्थांच्या गाड्या काढून घेण्यात आल्या.
पदाधिकारी आयुक्तांकडे
दरम्यान, आज हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे गेले होते. सागरपार्कवर गाड्या लावू द्या अन्यथा पर्यायी जागा द्या अशी त्यांनी मागणी केली. यावर आयुक्त संजय कापडणीस यांनी अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांना बोलावून याप्रश्नी आता पोलीस अधीक्षकांना पत्र देण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सागरपार्क हॉकर्सच्या जागेबाबत संयुक्त बैठकीचे आदेश केले होेत. त्यानुसार बैठकीची तारीख कळवावी असे शुक्रवारी पत्र दिले जाणार आहे.