शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मेधा पाटकर यांनी उपोषण मागे घ्यावे, प्रकृतीत बिघाड झाल्याने भाकपची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:37 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पार्टीने शुक्रवारी केले आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे ज्या ४० हजार कुटुंबांची घरे आणि जमिनी पाण्याखाली जाऊ शकतात

नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पार्टीने शुक्रवारी केले आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे ज्या ४० हजार कुटुंबांची घरे आणि जमिनी पाण्याखाली जाऊ शकतात, त्यांच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मेधा पाटकर वा अन्य १२ जण आठ दिवसांपासून उपोषण करीत आहेत. मेधा पाटकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.भाकपचे राष्ट्रीय सचिव डी. राजा म्हणाले की, या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करणार आहोत. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील आंदोलकांना बळजबरीने हटविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू नये, अशी मागणीही त्यांनी केली.उपोषणामुळे मेधा पाटकर यांच्या आरोग्यावर पारिणाम होत असल्याचे सांगून ते म्हणाले की, पाटकर यांनी उपोषण मागे घ्यावे. या आव्हानात्मक परिस्थितीत आम्हाला त्यांची गरज आहे. प्रख्यात अमेरिकी इतिहासकार नोम चोमस्की हे अलीकडेच या प्रकल्पामुळे प्रभावित लोकांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी एका आॅनलाइन याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. या प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.केजरीवाल यांचे विस्थापितांना समर्थननर्मदा सरोवरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मध्य प्रदेश सरकारने पुढे यावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केले आहे. मेधा पाटकर यांच्या बिघडत्या आरोग्याबाबतही त्यांनी काळजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील भाजप सरकारने मेधा पाटकर यांच्याशी संपर्कही साधलेला नाही. सरोवराचे दरवाजे बंद करण्यापूर्वी सरकारने विस्थापितांशी चर्चा करायला हवी. या प्रकल्पामुळे बडवानी, धार, अलीराजपूर आणि खरगोन जिल्ह्यांतील हजारो लोकांना आपली घर सोडावी लागणार आहेत.