शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पीक आणेवारीची पद्धत बदलणार

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पीक आणेवारीची पद्धत बदलणार

पीक आणेवारीची पद्धत बदलणार
-खडसेंची माहिती: उपग्रहाची मदत घेणार
मुंबई - राज्यातील पिकाची आणेवारी निि›त करण्याची विद्यमान पध्दत १०० वर्षे जुनी असून. तीत सुधारणा करण्यात येणार आहे. आणेवारी अचूक निि›त करता यावी यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून अचूक आर्द्रता मोजणे, जमिनीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज काढणे इत्यादी शिफारशी मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या आहेत. मात्र, या अहवालावर प्रदीर्घ चर्चा करण्याची गरज असल्याने १५ दिवसांत मंत्रिमंडळापुढे अहवाल ठेवला जाईल, अशी माहिती कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खडसे यावेळी म्हणाले, बीड, उस्मानाबाद, लातूर, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, जालना, अहमदनगर, परभणी या जिल्‘ातील मिळून ६९ तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जे जे उपाय करायचे असतात, ते करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. परभणी, नगर व जालना जिल्‘ात चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आणेवारी जाहीर होण्याची वाट न पाहता टंचाई असलेल्या भागात मागणी केलेल्या ठिकाणी चारा, पाणी व रोजगार देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी निकष शिथिल करण्यात येणार आहेत, असेही खडसे म्हणाले.
फळबागांचे पुनरुज्जीवन
पावसाअभावी द्राक्ष, पेरु, डाळींब या फळ पिकांच्या बागा सुकून गेल्या असतील तर त्यांच्या पुनर्लागवडीसाठी शासनातर्फे ५० टक्के अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. टंचाईग्रस्त भागात नरेगा/मरेगा च्या अंतर्गत रोजगार उपलब्ध करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले असून रोजगारापोटी मजुरांना द्यावयाची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यात ऑन लाईन पधतीने जमा केली जाणार आहे. चार्‍याच्या उपलब्धतेसाठी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, वन विकास मंडळ, शेती महामंडळ यांनी चारा लागवड केली असून वन विभागाकडील सर्व कुरणे राखीव ठेवण्याच्या व त्यांचा लिलाव न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)