शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम केंद्र शासन करणार रक्षा खडसे : सावदा, रावेर, निंभोरा येथे केळीची मोजणी

By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अजिंठा विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार खडसे म्हणाल्या की, चिखली ते फागणे या टप्प्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे तीन वेळा निविदा काढण्यात आली. मात्र तिन्ही वेळा प्रतिसाद न मिळाला नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या कामासाठी हायब्रीड पद्धतीने काम करण्याचा पर्याय होता. त्यात ४० टक्के शासन व ६० टक्के ठेकेदार असा पर्याय होता. मात्र तो प्रस्तावदेखील रद्द करण्यात आला. त्यामुळे आता संपूर्ण निधीची तरतूद करून केंद्र शासन या रस्त्याचे काम करणार आहे. त्यासाठी काही दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे अभियंत्यांचा प्रश्न लावला मार्गी
भुसावळ रेल्वे सह देशभरातील ८० हजार अभियंत्यांना देण्यात आलेला ग्रेड पे व पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. संसदेच्या अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा झाली. रेल्वेमंत्र्यांनी दखल घेत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच वरणगाव फॅक्टरीत प्रशिक्षणार्थी कालावधित काम करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राअभावी अडचणी येत होत्या. त्याबाबत चर्चा करून तो प्रश्न निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्‘ात होणार केळीची मोजणी
जिल्‘ात केळीचे मोठे क्षेत्र आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेद्वारे केळीची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे व शेतकरी यांचे नुकसान होत होते. शेतकर्‍यांना ट्रकद्वारे केळीची वाहतुकीसाठी व्यापार्‍यांवर अवलंबून रहावे लागत होते. या प्रकरणी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करीत जळगाव येथे केळीची मोजणी करण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे आता सावदा, रावेर, निंभोरा या ठिकाणी केळीचा माल मोजता येणार आहे. यापूर्वी हा माल झांसी येथे मोजण्यात येत होता. शेतकर्‍यांनी बीपीओ ट्रेनची मागणी केली होती. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद रेल्वे विभागाकडून मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी दिल्लीसह संपूर्ण देशभरात आपल्या मालाची विक्री करू शकणार आहे.