शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

घरातील स्वच्छतागृहासाठी ११ वर्षाच्या मुलीने सोडले जेवण

By admin | Updated: April 27, 2015 08:58 IST

मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यातील ११ वर्षाच्या ताराने घरात वडिलांनी स्वच्छतागृह बांधावा यासाठी दोन दिवस उपोषण केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २७ - मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यातील ११ वर्षाच्या ताराने घरात वडिलांनी स्वच्छतागृह बांधावा यासाठी दोन दिवसासाठी उपोषण केले. पैशाअभावी ताराच्या वडिलांना स्वच्छतागृह बांधता येत नव्हते, अखेरीस स्थानिक प्रशासनाने आर्थिक मदत दिल्याने ताराच्या घरातील स्वच्छतागृहाचे काम सुरु झाले आहे. सागर जिल्हा प्रशासनाने स्वच्छता मोहीमेसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ताराची नियुक्ती केली आहे. 
सागर जिल्ह्यातील किरोड गावात राहणारी तारा बन्सल ही गावातील सरकारी शाळेत सहावी इयत्तेत शिकते. काही दिवसांपूर्वी ताराच्या शाळेत एका समाजसेवी संस्थेने स्वच्छतेसंदर्भात जनजागृती अभियान राबवला होता. उघड्यावर शौचालयास जाऊ नये असा संदेशही या अभियानातून देण्यात आला होता. तारा या अभियानामुळे प्रभावित झाले व तिने घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी तगादा लावला. ताराचे वडिल महेश आणि काका पुरुषोत्तम हे दोघे शेतमजूर म्हणून काम करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बन्सल कुटुंबाच्या घरात स्वच्छतागृह नव्हते. यामुळे तारा व घरातील अन्य महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. चिमुकल्या ताराने या विरोधात लढा देण्याचा निर्धार करत दोन दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही. वडिलांनी आधी घरात शौचालय बांधावे असे तिचे म्हणणे होते. मुलीच्या हट्टाखातर महेश बन्सल यांनी शौचालयाचे बांधकाम सुरु केले. मात्र पैशाअभावी ते बंद पडले. अखेर जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती समजली व त्यांनी ताराच्या घरी जाऊन शौचालय बांधण्यासाठी मदत दिली. पहिल्या टप्प्यात आम्ही सहा हजार रुपये दिले असून उर्वरित पैसे बांधकाम पूर्ण झाल्यावर देऊ असे स्थानिक अधिका-यांनी सांगितले.