शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

भाजपाच्या बैठकीची फक्त औपचारीकता महापौर निवडणूक : डावलले जात असल्याने ज्येष्ठ सदस्यांमध्ये नाराजी

By admin | Updated: February 29, 2016 22:03 IST

जळगाव: महापौर निवडणुकीसाठी भाजपाने सोमवारी दुपारी नगरसेवकांची बैठक आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत आयोजित करून त्यात सीमा भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेण्याच्या खेळीमुळे ज्येष्ठ सदस्यांमध्ये नाराजीची भावना असल्याचे समजते. सीमा भोळे यांचे नाव महापौरपदासाठी आधीपासूनच चर्चेत असताना व आमदार सुरेश भोळे हे त्यासाठी प्रयत्नशील असताना बैठक आयोजित करून त्यात उमेदवार ठरविण्याची केवळ औपचारीकता असल्याची चर्चा भाजपा वर्तुळात सुरू आहे.

जळगाव: महापौर निवडणुकीसाठी भाजपाने सोमवारी दुपारी नगरसेवकांची बैठक आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत आयोजित करून त्यात सीमा भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेण्याच्या खेळीमुळे ज्येष्ठ सदस्यांमध्ये नाराजीची भावना असल्याचे समजते. सीमा भोळे यांचे नाव महापौरपदासाठी आधीपासूनच चर्चेत असताना व आमदार सुरेश भोळे हे त्यासाठी प्रयत्नशील असताना बैठक आयोजित करून त्यात उमेदवार ठरविण्याची केवळ औपचारीकता असल्याची चर्चा भाजपा वर्तुळात सुरू आहे.
आमदार सुरेश भोळे यांच्याकडे आमदारपदासोबतच जिल्हा बँकेचे संचालकपद, दूधसंघाचे संचालकपद, भाजपाचे महानगराध्यक्षपदही आहे. तसेच त्यांच्या रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागी त्यांच्या पत्नी सीमा भोळे यांनाच उमेदवारी देऊन निवडून आणले आहे. असे असताना आता महापौरपदही सीमा भोळे यांना मिळावे, अशी अपेक्षा धरणे चुकीचे असल्याची भावना भाजपातीलच काही सदस्यांकडून व्यक्त होत आहे. वास्तविक भाजपातील बहुतांश सदस्य हे सीमा भोळे यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांच्यापैकी एकाला ही संधी मिळावी, अशी भावना सदस्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच प्रकाश बालाणी यांनी नाव सुचविताना सीमा भोळे यांचेच नाव कसे सुचविले? त्यांना पक्षात असलेल्या ज्येष्ठ सदस्यांपैकी कोणीच सदस्य उमेदवारीयोग्य वाटला नाही का? की सर्व खेळी होती? असा सवाल उपस्थित होत आहे. आता पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे होणार्‍या बैठकीत ही नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.
बहुमत जुळविणे कठीण
भाजपात महापौरपदाच्या उमेदवारीवरून वाद असले तरीही भाजपाचे संख्याबळ अपुरे आहे. बहुमताचा आकडा गाठण्याइतपत बहुमत जुळविणे कठिण आहे. कारण मनसे व जनक्रांतीने खाविआला पाठींबा जाहीर केला आहे. मनसे व जनक्रांतीचे व्हीप मंगळवारी किंवा बुधवारी निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर व्हीप डावलून कुणा सदस्याला पक्षविरोधात मतदान करणे अशक्य होणार आहे. कारण २०१२ मध्ये आलेल्या पक्षांतर बंदी कायद्यातील दुरुस्तीमुळे व्हीप मोडणार्‍या नगरसेवकाला आयुष्यभरासाठी नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याची बंदी घातली जाते. त्यामुळे पाच-दहा लाखांच्या मोहापायी अशी आयुष्यभराची बंदी लादून घेण्यास किती नगरसेवक तयार होतील? असाही प्रश्नच आहे.
मनसे पुन्हा एकत्र
मनसेत मिलिंद कोंडू सपकाळे यांच्यासह चार नगरसेवक महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरून नाराज झाले होते. त्यामुळे ते पक्षापासून दुरावले होते. मात्र सोमवारी झालेल्या मनसेच्या बैठकीत चारपैकी तीन नगरसेवक उपस्थित होते. तर नितीन नन्नवरे यांनी आपण पक्षासोबत असल्याचेगटनेत्यांनाकळविलेअसल्याचेसांगितले.