शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांकडून शंभर कोटींची मागणी कुंभपर्व सांगता : साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागेचा आग्रह

By admin | Updated: August 12, 2016 01:30 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वाच्या सांगता सोहळ्यात महापौर अशोक मुर्तडक यांनी नाशिकच्या मूलभूत गरजांसाठी आणखी शंभर कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. साधू-महंतांनीही साधुग्रामसाठी तपोवनात कायमस्वरूपी जागेची मागणी करत घोषणा होऊनही त्याची पूर्तता न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली.

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वाच्या सांगता सोहळ्यात महापौर अशोक मुर्तडक यांनी नाशिकच्या मूलभूत गरजांसाठी आणखी शंभर कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. साधू-महंतांनीही साधुग्रामसाठी तपोवनात कायमस्वरूपी जागेची मागणी करत घोषणा होऊनही त्याची पूर्तता न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली.रामकुंडालगत कपालेश्वर मंदिरासमोरील पटांगणात आयोजित सांगता समारंभात महापौर अशोक मुर्तडक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, महापालिकेने केलेल्या नियोजनामुळे कुंभमेळा यशस्वी झाला. महाराष्ट्र शासनही महापालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पालकमंत्र्यांसह स्थानिक आमदारांनी खांद्याला खांदा लावून काम केले. सिंहस्थ यशस्वीतेचे सारे श्रेय नाशिककरांकडे जाते. पर्वणीकाळात अनेक हालअपेष्टा सहन करत त्यांनी कुंभमेळा यशस्वीतेसाठी हातभार लावला. स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येत मदतीचा हात दिला. मात्र, महापालिकेला शासनाने दिलेला सिंहस्थ निधी अपुरा पडला. महापालिकेला आणखी १०० कोटींची नितांत गरज आहे. जकात बंद झाली. एलबीटीपासून तुटपुंजे उत्पन्न प्राप्त होत आहे. अशा स्थितीत सिंहस्थाची उर्वरित कामे करताना महापालिकेची दमछाक होत आहे. नाशिककरांच्या मूलभूत गरजा बाजूला ठेवत महापालिकेने त्यांच्याकडूनच मिळालेला कररुपी पैसा सिंहस्थ कामांसाठी वापरला. त्यामुळे शासनाने आता महापालिकेला वाढीव शंभर कोटी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही महापौर अशोक मुर्तडक यांनी केली.