शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

संभाव्य निकालांबाबत मायावती-अखिलेश यांच्यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:16 IST

एक्झिट पोलचा धसका : उत्तर प्रदेशावर साऱ्या देशाचे लक्ष; महागठबंधनला मिळणाºया जागांबाबत उत्सुकता

लखनऊ : राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आघाडी भाजपपेक्षा लोकसभेच्या जास्त जागा जिंकेल, असा निष्कर्ष एक्झिट पोलमधून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बसपच्या प्रमुख मायावती व समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी चर्चा केली.

मायावती यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी अखिलेश यादव यांनी सुमारे तासभर चर्चा केली. त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा तपशील कळू शकलेला नाही. तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी या दोन नेत्यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकांत कोणालाच बहुमत न मिळाल्यास केंद्रात सरकार स्थापनेसाठी काय रणनीती आखायची, याबाबत त्यांच्याशी नायडू यांनी चर्चा केली होती.

भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला दूर ठेवून सप व बसपने लोकसभा निवडणुकांत आघाडी केली होती. उत्तर प्रदेशमध्ये ८० लोकसभेच्या जागा आहेत. जागावाटपानुसार बसपला ३८ व सपला ३७ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रीय लोक दलाला २ जागा देण्यात आल्या होत्या, तसेच रायबरेली, अमेठी येथे अनुक्रमे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात आपला उमेदवार उभे न करण्याचे बसप, सपने ठरविले होते. (वृत्तसंस्था)

भाजपवर मात करणार?उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आघाडी भाजपकडूनही काही जागा खेचून घेईल, असेही म्हटले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये ७१ जागा जिंकल्या होत्या. सी व्होटर-रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे की, सप-बसप आघाडीला ४० व भाजपला ३८ जागा मिळतील. जन की बात पोलच्या निष्कर्षानुसार भाजपला ४६ ते ५७ जागा, तर सप-बसपला १५ ते २९ जागा मिळतील. एबीपी न्यूजच्या एक्झिट पोलने उत्तर प्रदेशात भाजपला २२ जागा मिळतील, असे म्हटले आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९