वल्लभगडावर १४ मे ला संभाजीराजे जयंती
By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST
संकेश्वर :वल्लभगड (ता. हुक्केरी) येथे वल्लभगड बेबपोर्टल समिती व धर्मवीर संभाजीराजे क्लब कमिटी यांच्यातर्फे बुधवारी (दि. १४) सकाळी ७ वाजता छ. संभाजीराजेंची ३५७ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे.संकेश्वरपासून २ कि. मी. अंतरावर हा शिवकालीन वल्लभगड आहे. संकेश्वर नगरपरिषदेच्या संभाजी उद्यान येथून वल्लभगडावर ज्वाला मिरवणूक काढण्यात येणार आहे. ...
वल्लभगडावर १४ मे ला संभाजीराजे जयंती
संकेश्वर :वल्लभगड (ता. हुक्केरी) येथे वल्लभगड बेबपोर्टल समिती व धर्मवीर संभाजीराजे क्लब कमिटी यांच्यातर्फे बुधवारी (दि. १४) सकाळी ७ वाजता छ. संभाजीराजेंची ३५७ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे.संकेश्वरपासून २ कि. मी. अंतरावर हा शिवकालीन वल्लभगड आहे. संकेश्वर नगरपरिषदेच्या संभाजी उद्यान येथून वल्लभगडावर ज्वाला मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता जन्मोत्सव व सायंकाळी ५ वाजता सांगलीचे सुनील बापू लाड यांचे छ. संभाजीराजेंच्या जीवनचरित्र या विषयावर व्याख्यान होईल. (प्रतिनिधी)