शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मौलवी मोहम्मद हनिफ केरळमधून अटकेत

By admin | Updated: August 15, 2016 06:44 IST

मुस्लीम तरुणांना इसिसमध्ये सहभागी करण्यासाठी प्रवृत्त करणारा मौलवी मोहम्मद हनिफला शनिवारी केरळमधील कन्नुर जिल्ह्यातून त्याला अटक केली.

मुंबई : मुस्लीम तरुणांना इसिसमध्ये सहभागी करण्यासाठी प्रवृत्त करणारा मौलवी मोहम्मद हनिफला शनिवारी केरळमधील कन्नुर जिल्ह्यातून त्याला अटक केली. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. न्यायालयाने त्याला २० तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे ब्रेन वॉश केल्याप्रकरणी केरळ एटीएसने अर्शिद कुरेशी आणि रिझवानविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्या पाठोपाठ केरळमधील अब्दुल कदार यांच्या मुलगा अश्फाक याचे मतपरिवर्तन करून त्याला इसिसमध्ये सहभागी केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अर्शिद, रिझवान, मोहम्मद हनिफ आणि रशीद अब्दुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील अब्दुला याने देश सोडून इसिसमध्ये सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे. हनिफने केरळमधील अश्फाकसह २१ तरुणांचे मतपरिवर्तन करून त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात येत आहे. मूळचा केरळ येथील रहिवासी असलेल्या हनिफला अश्फाक भेटत होता. हनिफनेच कुरेशी आणि रिझवानसोबत अश्फाकची भेट घालून दिली होती. केरळसहीत मुंबईतील डोंगरी येथे असलेल्या डॉ. झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यालयात त्यांनी भेट घेतली होती. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी अधिक चौकशीसाठी कुरेशी आणि खानची कोठडी मिळावी, म्हणून गुन्हे शाखेने पाठपुरावा सुरू केला आहे. (प्रतिनिधी)