शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

मांढळ येथे गणित शिक्षकांची कार्यशाळा

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

(फोटो)

(फोटो)
मांढळ येथे गणित शिक्षकांची कार्यशाळा
मांढळ : स्थानिक महामायादेवी विद्यालयाच्या सभागृहात कुही तालुका गणित अध्यापक मंडळाच्यावतीने गणित शिक्षकांच्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्यायापक विनय गजभिये होते. मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम पंचभाई उपस्थित होते. यावेळी गणित मंडळाच्या विविध योजना, विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबाबत आवड निर्माण करणे, त्यांना मनोरंजनात्मक पद्धतीने शिकविणे, त्यांच्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० पैकी १०० गुण प्राप्त करणाऱ्या नरहरी वाडीभस्मे व अतुल घायवट या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक डंभारे यांनी केले. संचालन पिंपरे यांनी केले तर, विजय पुडके यांनी आभार मानले. यशस्वितेेसाठी सज्जन पाटील, मधुकर राऊत, सी.पी. मेश्राम यांच्यासह अन्य शिक्षकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
***
(फोटो)
भुते कॉलेजच्या आवारात वृक्षारोपण
साळवा : स्थानिक सहदेव भुते महाविद्यालयाच्या आवारात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरणाबाबत जनजागृती केली. अध्यक्षस्थानी प्रा. प्रांजली मेहर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुनील तिरपुडे, प्रा. रोशन वासनिक, प्रा. मंगला शेंडे, प्रदीप गाढवे, कमलाकर अवैकर, रोशन डहाके, नीलेश भुते आदी उपस्थित होते. यावेळी अतिथींसह विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून रोपट्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. (वार्ताहर)
***
(फोटो)
डोंगरमौदा येथे योग शिबिराची सांगता
कुही : तालुक्यातील गौतम विद्यालयात योगा व प्राणायाम शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारत स्वाभिमान समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप काटेकर, मुख्याध्यापक बी. एम. नानोटे, दीपक येवले, दत्तू चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योगा व प्राणायामाचे प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले. पतंजली योग समितीच्या तालुका प्रभारी शोभा गांगलवार यांनी वनौषधींची ओळख करून देत त्यांची उपयोगिता सांगितली. जगदीश राठोड यांनीही मार्गदर्शन केले. या शिबिरात ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक जी. यु. खोब्रागडे यांनी केले. संचालन भालचंद्र गांगलवार यांनी केले तर बी. एम. नंदेश्वर यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)
***