केबलसाठी रस्ते खोदणार्या कंपनीचे साहित्य जप्त
By admin | Updated: March 15, 2016 00:32 IST
जळगाव: एका खाजगी कंपनीतर्फे शहरात फोर-जी नेटवर्कसाठी केबल टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी रस्ते खोदून केबल टाकली जात आहे. त्यासाठी घेतलेल्या परवानगीची मुदत संपल्यावरही मुदतवाढ न घेता खोदकाम करीत असल्याने मनपाच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी ट्रॅक्टर व खोदकामासाठीचे साहित्य जप्त केले.
केबलसाठी रस्ते खोदणार्या कंपनीचे साहित्य जप्त
जळगाव: एका खाजगी कंपनीतर्फे शहरात फोर-जी नेटवर्कसाठी केबल टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी रस्ते खोदून केबल टाकली जात आहे. त्यासाठी घेतलेल्या परवानगीची मुदत संपल्यावरही मुदतवाढ न घेता खोदकाम करीत असल्याने मनपाच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी ट्रॅक्टर व खोदकामासाठीचे साहित्य जप्त केले. याबाबत बांधकाम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या खाजगी कंपनीने शहरात सुमारे ७६ किमीची केबल टाकण्याची परवानगी घेतली असून त्यासाठी साडेतीन कोटी रुपये मनपाकडे नुकसान भरपाई म्हणूनही भरले आहेत. मात्र त्यासाठीची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. ती मुदत मनपाकडून वाढवून घेणे आवश्यक असतानाही तसे न करता, तसेच मनपाच्या संबंधित विभागातील अभियंत्यांना सोबत न घेताच परस्पर रस्ते खोदण्याचे काम सुरू होते. दोन आठवड्यांपूर्वी बळीरामपेठेत मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनलाच होल पडले होते. ती तातडीने दुरुस्त करून घेण्यात आली होती. त्यानंतरही रस्ते खोदणे सुरू असल्याने रविवारी नटवर कॉम्प्लेक्ससमोर खोदकाम सुरू असताना ट्रॅक्टर व खोदकामाचे साहित्य जप्त करण्यात आले.