शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसवरून मार्क्सवादीमध्ये तणाव, केंद्रीय समिती बैठक; दोन्ही गटांच्या प्रस्तावांंवर मतदान अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:55 IST

लोकसभेच्या २0१९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्याचा विचार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गांभीर्याने सुरू झाला आहे. दिल्लीत मार्क्सवादी पक्षाच्या मुख्यालयात दोन दिवसांपासून पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक सुरू असून....

सुरेश भटेवरा नवी दिल्ली  - लोकसभेच्या २0१९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्याचा विचार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गांभीर्याने सुरू झाला आहे. दिल्लीत मार्क्सवादी पक्षाच्या मुख्यालयात दोन दिवसांपासून पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक सुरू असून, त्यात काँग्रेससह अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवण्याच्या बाजूने आणि विरोधात येचुरी विरुध्द करात गटात ओढाताण सुरू आहे.पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी विशाखापट्टणम येथे माकपने कोणत्याही स्थितीत भाजपा अथवा काँग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या भूमिकेत बदल करू नये, असे माजी महासचिव प्रकाश करात यांच्या गटाला आजही वाटते. मध्यंतरी १६ सदस्यांच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत २0१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा सामना करण्यासाठी इतर धर्मनिरपेक्ष पक्षांशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी मांडला. त्यात काँग्रेसचा थेटपणे उल्लेख नव्हता.अंतिम निर्णय हैदराबादमध्येकेंद्रीय समितीत येचुरी व प्रकाश करात असे दोन गट पडले असून, दोघांच्या परस्पर विरोधी प्रस्तावांवर सोमवारी बहुदा मतदान होण्याची शक्यता आहे. जो प्रस्ताव मंजूर होईल तो २0१८ सालच्या हैद्राबाद येथे होणाºया पक्षाच्या काँग्रेसपुढे मांडला जाईल व त्यावर साधक बाधक चर्चा होउन २0१९ च्या निवडणुकीबाबत पक्षाची अंतिम भूमिका ठरेल. तथापि सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय समितीत याच विषयावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे व बहुतांश सदस्य येचुरींच्या मताशी सहमत असल्याचे चित्र दिसते. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस