शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
5
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
6
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
7
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
8
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
9
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
10
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
11
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
12
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
13
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
14
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
15
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
16
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
17
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
18
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
19
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
20
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."

मारूती सुझुकीच्या फॅक्टरीत लपलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:39 AM

फॅक्टरीच्या इंजिन रूमजवळ असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या टीमकडून अथक मेहनत घेतली जाते आहे.

ठळक मुद्देफॅक्टरीच्या इंजिन रूमजवळ असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या टीमकडून अथक मेहनत घेतली जाते आहे. पंधरा जणांच्या या टीमने खास युक्ती लढवून लपलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गुरूग्राम- गुरूवारी सकाळी मानेसरमधील मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये बिबट्या शिरला होता. फॅक्टरीच्या इंजिन रूमजवळ असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या टीमकडून अथक मेहनत घेतली जाते आहे. पंधरा जणांच्या या टीमने खास युक्ती लढवून लपलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या इंजिन रूमजवळ असल्याचं दिसलं होतं त्यानंतर टीमने सुरूवातीला विविध युक्त्या लढवून त्याला परडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. टीमने इंजिन युनिट बंद करून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

गुरूवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास बिबट्या फॅक्टरीमध्ये शिरला होता. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी, जिल्हा वन अधिकारी, पशुवैद्यकीय डॉक्टर तसंच वन्यजीव निरीक्षकांची टीम साडेसहाच्या सुमारास घटनास्थळी पोहचली. सात-आठ जणांच्या दोन वेगवेगळी पथकं तयार करून बिबट्याचा शोध घेतला जात होता. पण तरीही लपून बसलेला बिबट्या सापडत नाही.

फॅक्टरीचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता. इंजिन युनिट खूप मोठं असल्यामुळे बिबट्या नेमका कुठे असणार हे शोधणं कठीण होतं. बिबट्या फॅक्टरीच्या परिसरात फिरताना सीसीटीव्हीमध्ये पाहिलं पण त्याची नेमकी जागा कळत नव्हती. म्हणूनच लपलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही इंजिन रूममध्ये बकऱ्या ठेवल्या आणि इंजिन रूमची लाइट बंद केली. इंजिन रूममध्ये ठेवलेल्या सगळ्या बकऱ्या सुरक्षित असून बिबट्याने त्यांना मारलं नाही, अशी माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने बचावकार्यात येण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही त्यांना नकार दिला. तसंच फॅक्टरीच्या आत प्रवेश करायला मनाई केली होती, असं वन संरक्षक अधिकारी विनोद कुमार यांनी म्हंटलं आहे. बिबट्याला घाबरविण्यासाठी फॅक्टरीमध्ये फटाके फोडल्याचं बोललं जात होत, पण त्याला कुमार यांनी नकार दिला. फॅक्टरीत फटाके वाजविले नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

आत्तापर्यंतच्या बिबट्याला वाचविण्याच्या घटनांपैकी ही घटना सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक आहे. इंजिन युनिटमध्ये बिबट्याला लपायला खूप जागा असल्याने काम करणं कठीण असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. बिबट्याला वाचवणं हा आमचा हेतून असून ते आम्ही पूर्ण करणार. रात्रीच्या वेळी बिबट्याला पकडता येईल. मारूती सुझुकीच्या व्यवस्थापनाकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्याचा उद्देश असून त्यासाठी दोन दिवस लागले तरी चालणार आहेत, असं कुमार यांनी सांगितलं. 

नेमकं काय घडलं?गुरूग्राममधील मानेसरमध्ये असलेल्या मारूती सुझुकीच्या प्रकल्पात बिबट्या घुसला. गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्या मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये घुसला. बिबट्या जेव्हा फॅक्टरीमध्ये घुसला त्यावेळी फॅक्टरीच्या आवारात कर्मचारी उपस्थित नव्हते. पण प्रकल्पातील सुरक्षा रक्षक आणि वाहतूक विभागाचे काही कर्मचारी कार्यालायात होते. फॅक्टरीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बचाव करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. गुरूवारी सकाळी बिबट्या मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये शिरल्याने मॉर्निंग शिफ्टसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे.