शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त

By admin | Updated: August 21, 2015 22:29 IST

भारतीय कु टुंबांमध्ये सातत्याने कमी होत चाललेली व्यक्तिगत सहनशीलता आणि वैवाहिक जीवनातील वाढता ताणतणाव यामुळे देशात अविवाहितांच्या

इंदूर : भारतीय कु टुंबांमध्ये सातत्याने कमी होत चाललेली व्यक्तिगत सहनशीलता आणि वैवाहिक जीवनातील वाढता ताणतणाव यामुळे देशात अविवाहितांच्या तुलनेत विवाहितांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) एका अहवालात ही बाब उघड झाली आहे. या अहवालानुसार इ.स.२०१४ साली आत्महत्या करणाऱ्या एकूण लोकांपैकी ६५.९ टक्के विवाहित होते, तर २१.१ टक्के आत्महत्याग्रस्तांचे लग्न झाले नव्हते. आत्महत्या करणारे १.४ टक्के लोक घटस्फोटित अथवा कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या जोडीदारापासून विभक्त झाले होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभय जैन यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही आकडेवारी भारतीय कुटुंब व्यवस्थेतील गंभीर बदलाचे संकेत देत असल्याचे स्पष्ट केले. विवाहितांमधील वाढत्या आत्महत्यांची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, देशात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत असून विभक्त कुटुंबांकडे अधिक कल आहे. यामुळे कुटुंबातील संघर्ष वाढत असून व्यक्तिगत सहनशीलता सातत्याने कमी होत आहे. विभक्त कुटुंबात राहणारे दाम्पत्य आपल्या व्यावसायिक आणि खासगी समस्यांबद्दल एकमेकांसोबत मनमोकळी चर्चा करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एकट्याने समस्यांना तोंड देत असल्याने ते नैराश्यग्रस्त होत आहेत आणि शेवटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. (वृत्तसंस्था)