शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नवरदेवाच्या आयटम साँगच्या हट्टामुळे विवाह मोडला

By admin | Updated: March 13, 2016 12:51 IST

लग्नाच्या रात्री नववधूवर नव-यासोबत बॉलिवूडच्या आयटम सॉंगवर डान्स करण्याची जबरदस्ती केली म्हणून नववधू भरमंडपातून विवाह मोडून निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

ऑनलाइन लोकमत 

फिरोझाबाद, दि. १३ - लग्नाच्या रात्री नववधूवर नव-यासोबत बॉलिवूडच्या आयटम सॉंगवर डान्स करण्याची जबरदस्ती केली म्हणून नववधू भरमंडपातून विवाह मोडून निघून गेल्याची  घटना उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात घडली. 
विवाहसोहळा सुरु असताना नव-याच्या मित्रांनी नवविवाहीत जोडप्याकडे आयटम साँगवर डान्स करण्याचा आग्रह धरला. पण नववधूने नकार दिला. ती स्टेजवरच थांबली. त्यानंतर नव-याने डान्स फ्लोअरवर जाऊन मित्रांसोबत जाऊन ठेका धरला. 
त्यानंतर नवरा स्टेजवर आला व नववधूला सोबत डान्स करण्यासाठी जबरदस्ती करु लागला. त्यावेळी नववधूच्या काकांनी मध्ये हस्तक्षेप केला. पण चिडलेल्या नवरदेवांनी थेट त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतापलेल्या वधूने गळयातील हार काढून फेकून दिला आणि लग्न मोडल्याचे जाहीर करुन स्टेजवरुन निघून गेली. 
क्षणार्धात लग्न मोडल्यामुळे संतापलेल्या वरपक्षाची वधूपक्षाबरोबर वादावादी सुरु झाली. विषय हाणामारीपर्यंत गेला. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. नवरदेव त्याच्या वडिलांसह सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण लिखित तक्रार न नोंदवल्यामुळे पोलिसांनी त्यांची सुटका केली.