शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

सप्तपदीविना हिंदूंचा विवाह वैधच

By admin | Updated: November 12, 2015 00:12 IST

सप्तपदी आणि मंगळसूत्रबंधन याविना हिंदूचे ‘स्वयंमर्यादा’ विवाह लावण्यासाठी तामिळनाडू सरकारने सुमारे ५० वर्षांपूर्वी केलेला कायदा घटनात्मक वैध असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

चेन्नई : भटजीचे मंत्रपठण, लाजाहोम, सप्तपदी आणि मंगळसूत्रबंधन याविना हिंदूचे ‘स्वयंमर्यादा’ (आत्मसन्मान) विवाह लावण्यासाठी तामिळनाडू सरकारने सुमारे ५० वर्षांपूर्वी केलेला कायदा घटनात्मक वैध असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.तामिळनाडू सरकारने हिंदू विवाह कायद्यात ७ ए हे नवे कलम अंतर्भूत करून ‘स्वयंमर्यादा’ या सरळ, सोप्या पद्धतीने विवाह करण्याची सोय केली. या कायद्याच्या वैधतेस आव्हान देणारी अ‍ॅड. ए. असुवथमन यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना मुख्य न्यायाधीश न्या. संजय किशन कौल व न्या. टी. एस. शिवाग्ननन यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘मुळात हिंदू धर्म विविधांगी असून त्यात त्या त्या प्रदेशानुसार व रीतिभातींप्रमाणे विवाह करण्याच्या अनेक पद्धती परंपरेने रूढ झालेल्या आहेत. तामिळनाडू सरकारने कायदा दुरुस्ती करून अशाच एका सोप्या पद्धतीने विवाह करण्याची सोय हिंदूंना करून दिली आहे. शिवाय राज्यात ‘स्वयंमर्यादा’ पद्धतीने लावलेले विवाह गेली पाच दशके काळाच्या कसोटीवर उतरले आहेत, असेही खंडपीठाने नमूद केले.या कायद्याच्या वैधतेस आव्हान देताना कायदेशीर मुद्द्यांखेरीज याचिकाकर्त्यांचा असाही आक्षेप होता की, एका ठराविक राजकीय चळवळीची विचारसरणी पुढे रेटण्यासाठी हा कायदा केला गेला आहे. पण यावर टीका करताना न्यायालयाने म्हटले की, जणू काही देशात सध्या फूटपाडू मुद्द्यांची वानवा आहे म्हणून या याचिकेने असाच एक मुद्दा समोर आणण्याचा हेतू साध्य केला आहे. देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने गृहस्थाश्रम स्वीकारणे हे हिंदू विवाह पद्धतीमधील पारंपरिक धार्मिक विधी आहेत. तामिळनाडू सरकारच्या कायद्याने या विधींना फाटा दिल्याने तो घटनाबाह्य ठरवावा, असा अ‍ॅड. असुवथमन यांचा आग्रह होता; परंतु न्यायालयाने म्हटले की, व्यक्तिगत कायद्याशी संबंधित अशा बाबींमध्ये विवाह करण्याच्या पद्धतीत दिले गेलेले पर्याय राज्यघटनेनुसार कसे निषिद्ध ठरतात हे याचिकाकर्त्यांनी दाखविलेले नाही. विधिमंडळाने केलेला कायदा वैधच असतो. ते खोडून काढण्यासारखे याचिकेत आम्हाला काही दिसत नाही.न्यायालयाने म्हटले की, वैध हिंदू विवाहासाठी पुरोहिताच्या साक्षीनेच करण्याची गरज नाही, हा या कायदा दुरुस्तीचा मुख्य गाभा आहे. वधू-वरांच्या नातेवाईकांची व मित्रमंडळींची विवाहास उपस्थिती असणे पुरेसे आहे. दोघांनीही पती/पत्नी म्हणून परस्परांचा स्वीकार केल्याचे सुस्पष्ट शब्दांत उच्चारण करणे व त्यानंतर त्यांनी एकमेकांना हार घालणे किंवा एक दुसऱ्याच्या कोणत्याही बोटात अंगठी घालणे या गोष्टी पुरेशा आहेत. हिंदू वैदिक संस्कृतीचे जोखड झुगारून देण्यासाठी ईव्हीआर पेरियार यांनी १९२५ मध्ये तामिळनाडूत प्रखर द्राविडी चळवळ उभारली. याच चळवळीतून द्रविड मुन्नेत्र कझगम हा राजकीय पक्ष उदयाला आला व १९६७ मध्ये सी. एन. अण्णादुराई या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री झाले. अण्णादुराई यांनी सत्तेवर येताच पहिला निर्णय ‘स्वयंमर्यादा’ विवाहांचा घेतला व त्याच्या पुढच्याच वर्षी अशा विवाहांना वैधानिक अधिष्ठान देणारा कायदा केला गेला.