शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पूर्वपदावर येत असतानाच काश्मिरात बाजारपेठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 06:19 IST

सलग तिसऱ्या दिवशी शुकशुकाट; थोड्या वेळासाठीही उघडली नाहीत दुकाने

श्रीनगर : काश्मिरातील बहुतांश दुकाने, व्यवसाय सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी बंद होते. शहरासह काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी पोस्टर लावून दुकाने न उघडण्याचे, तसेच वाहतूक सुरू ठेवू नये, असे धमकीवजा आवाहन करण्यात आले होते.गत काही दिवसांपासून असे वाटत होते की, काश्मीर खोऱ्यातील जनजीवन सामान्य होत आहे; पण या पोस्टरमुळे ही आशा संपुष्टात आली. शहरातील मुख्य बाजारपेठांत आणि काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भाग बंद होता. दुकाने सकाळी काही तासांसाठीही उघडली नाहीत. काही आठवड्यांपासून ही दुकाने सकाळी काही तासांसाठी उघडली जात होती.सार्वजनिक परिवहन सेवा दिसून येत नव्हती. खासगी वाहनेही खूपच कमी प्रमाणात दिसत होती. काही ऑटो रिक्षा आणि आंतरजिल्हा कॅब मात्र दिसून येत होत्या. काश्मिरमध्ये गत दोन आठवड्यांपासून वातावरण बदलत होते. काश्मिर खोऱ्यातील दुकानदार सकाळी लवकर दुकाने उघडून दुपारनंतर बंद करत होती. पण, पोस्टरच्या माध्यमातून दिलेल्या धमकीनंतर दुकानदारही धास्तावले आहेत. ५ ऑगस्टपासून खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत आहे. अशी आहे परिस्थितीकाश्मिरातील मोठी मशीद जामिया मशीद सलग १६ व्या शुक्रवारी नमाजासाठी बंद होती. केंद्र सरकारने काश्मिरातील कलम ३७० हटविण्याचा निर्णय ५ ऑगस्ट रोजी घेतल्यापासून शुक्रवारची नमाज होत नाही. ५ ऑगस्टपासून प्रीपेड मोबाईल फोन आणि सर्व इंटरनेट सेवा बंद आहेत. प्रमुख आणि दुसºया फळीतील फुटीरवादी नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, अथवा नजरकैदेत ठेवण्यात आलेले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370