सभापतीपदासाठी रस्सीखेच बाजार समिती : सेना-भाजपाचे प्रयत्न
By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST
जळगाव- सेना, भाजपा व काँग्रेस बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र लढले, पण आता सभापतीपदावरून सेना व भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
सभापतीपदासाठी रस्सीखेच बाजार समिती : सेना-भाजपाचे प्रयत्न
जळगाव- सेना, भाजपा व काँग्रेस बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र लढले, पण आता सभापतीपदावरून सेना व भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. बाजार समितीमध्ये सेना व भाजपाचे समान म्हणजेच सहा-सहा असे संख्याबळ आहे. त्यात काँग्रेसच्या यमुनाबाई सपकाळे या कुणाला पाठींबा देतील याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची भूमिका सपकाळे यांच्या पाठींब्याबाबत महत्त्वाची आहे. संख्याबळ वाढविण्यासाठी चढाओढआपापले संख्याबळ वाढावे यासाठी सेना व भाजपा यांच्यात चढाओढ सुरू आहे. यातच भाजपाने आपल्याकडे तापीकाठावरील एका गावातील संचालक आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणजेच सात संचालक भाजपाच्या तंबूत आल्यास भाजपाची सभापतीपदावरील दावेदारी प्रबळ होईल. असाच प्रयत्न सेनेचाही आहे.लक्ष्मण पाटील यांचा सेनेला बिनशर्त पाठिंबासर्वसामान्य शेतकरी पॅनलचे प्रमुख लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांनी सेना-भाजपात रस्सीखेच सुरू असतानाच आपला शिवसेनेच्या गटाला बिनशर्त पाठिंबा असेल. आपले पाचही संचालक आमदार गुलाबराव पाटील निर्देश देतील त्या उमेदवाराला सभापतीपदासाठी मतदान करतील, पण आमदार पाटील यांनी आपल्या गटाचा सभापती बनवावा, अशी जाहीर भूमिका मांडली आहे. सुरेशदादांचा गट भाजपाविरोधातबाजार समितीत अनेक वर्षे माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाची सत्ता होती. सुरेशदादांनी पाच वर्षात पाच जातीचे सभापती बनविण्याचा प्रघात पाडला होता. १० संचालक सभापती व उपसभापती व्हायचे, पण या निवडणुकीत सेना-भाजपा प्रणीत पॅनलचे सुरेशदादांचे छायाचित्रदेखील आपले फलक, पत्रके आदींवर लावले नव्हते. यामुळे युतीच्या पॅनलला १३ जागांवर समाधान मानावे लागले व लक्ष्मण पाटील यांना अनपेक्षितपणे पाच जागा मिळाल्या. ही बाब लक्षात घेता बाजार समितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपाशी संबंधित व्यक्ती सभापती होऊ नये यासाठी सुरेशदादांचे समर्थक राहिलेले संचालक व शेतकरी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळाली. कोटसेना-भाजपाचे नेते एकत्र बसून सभापतीपदाबाबत निर्णय घेतील. अजून निर्णय झालेला नाही. १३ रोजी आमचा निर्णय होईल व त्यात पदाधिकार्यांची नावे निश्चित होऊ शकतील. लक्ष्मण पाटील यांनी शेतकरी हिताची भूमिका घ्यावी. त्यास आपला पाठींबा असेल. -आमदार गुलाबराव पाटीलकोट-बाजार समितीमध्ये शिवसेनेने आपला सभापती बसवावा. त्यासाठी आपला सेनेला बिनशर्त पाठींबा आहे. आमचे सर्व संचालक सेना पुरस्कृत व्यक्तीला सभापतीपदासाठी मतदान करतील. -लक्ष्मण पाटील (लकी टेलर), प्रमुख, सर्वसामान्य शेतकरी पॅनल