शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची हत्या : दोष सिद्ध

By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST

विवाहितेची हत्या

विवाहितेची हत्या
तिघांविरुद्ध दोष सिद्ध

न्यायालय : मंगळवारी शिक्षेवर सुनावणी

नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन एका विवाहितेला क्रूर वागणूक देऊन तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून जिवंत जाळून हत्या केल्याचा तीन आरोपींविरुद्ध प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात शुक्रवारी दोष सिद्ध झाला. मंगळवारी न्यायालयात आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.
राजेश मदनलाल जोशी (३३), विमल मदनलाल जोशी (५३) आणि पवन मदनलाल जोशी (३१), अशी आरोपींची नावे असून ते सर्व लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज गुजरी येथील रहिवासी आहेत. संगीता राजेश जोशी (२८), असे मृत महिलेचे नाव होते.
हत्येची घटना ८ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी ५ ते ७ वाजताच्या दरम्यान घडली होती. घटनेच्या दीड वर्षांपूर्वी संगीताचा राजेश जोशी याच्यासोबत विवाह झाला होता. राजेश हा पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करायचा. संसाराला लागल्यापासूनच माहेरून पैसे आणण्याची मागणी करून तिच्या छळाला सुरुवात झाली होती. पुढे संशयखोर पतीकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्या जात होता. तिला तो वारंवार मारहाण करायचा. पती, सासू आणि दीर हे तिला क्रूर वागणूक देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या छळाविरुद्ध तिने कामठीच्या आपत्ग्रस्त महिला मार्गदर्शन व मदत केंद्राकडे तक्रारही केली होती. परंतु समझोता घडवून तिला पुन्हा या संसारात ढकलण्यात आले होते.
घटनेच्या दिवशी संगीता ही सहा महिन्यांचा मुलगा जय याने अंगावर लघवी केल्याने झोपेतून उठली होती. ती आपली साडी स्वच्छ करीत असतानाच तिचा पती राजेश याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडायला सुरुवात केली होती. त्यानंतर तिची सासू विमल ही उठून राजेशजवळ आली होती. मोहल्ल्यात आपली खूप बदनामी झाली आहे, आज हिला खतम करून टाकू, अशी चिथावणी तिने दिली होती. राजेशने तिच्या अंगावर रॉकेल ओतले होते. दीर पवन याने तिला पकडून ठेवून विमलने आगकाडी उगाळून तिला जाळले होते. मेयो इस्पितळात तिला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मृत्यूपूर्व बयाण नोंदवल्यानंतर १३ नोव्हेंबर २०१३ रोजी तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले होते.

अपूर्ण -----