शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विश्व पुस्तक मेळ््यात मराठीचा एकमेव स्टॉल

By admin | Updated: January 14, 2016 00:18 IST

प्रगती मैदानावरील सुरू असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘विश्व पुस्तक मेळ््यात’ जगातील ३० देशांमधील विविध भाषेतील पुस्तके व लक्षवेधक प्रकाशनांचे आकर्षक स्टॉल्स

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली प्रगती मैदानावरील सुरू असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘विश्व पुस्तक मेळ््यात’ जगातील ३० देशांमधील विविध भाषेतील पुस्तके व लक्षवेधक प्रकाशनांचे आकर्षक स्टॉल्स सजले असताना यंदाही मराठी पुस्तके व प्रकाशनांचा केवळ एक स्टॉल असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या आग्रहाचे झेंडे फडकवले जातात. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात यासाठी तोडफोड आंदोलने होतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी दिखाऊ आग्रहदेखील धरला जातो. तथापि जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य, उत्तम ग्रंथ व प्रकाशने पोहोचावीत यासाठी मात्र कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. यंदाच्या विश्व पुस्तक मेळ्यात मराठी पुस्तकांचा एकमेव स्टॉल आहे तो मराठी प्रकाशक संघाचा. तो देखील दिल्लीत दोन जणांच्या नऊ दिवसांच्या फुकट निवास व्यवस्थेसह विनामूल्य भाड्याचा स्टॉल. सर्वात लहान आकाराच्या या स्टॉलमध्ये मराठीतील नामवंत प्रकाशनांचा तसा अभावच आहे. पुण्याच्या कुमार एजन्सीजचे सुकुमार बेरी दरवर्षी निवडक पुस्तकांसह निष्ठेने हा स्टॉल सजवतात आणि राजधानीत कसेबसे मराठीचे निशाण फडकवतात. याखेरीज साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्टच्या मोठमोठ्या स्टॉल्समध्ये कुठेतरी मराठी पुस्तकांचे एखादे टेबल दिसते. जागतिक दर्जाच्या पुस्तक मेळ््यात इतकेच काय ते मराठीचे अस्तित्व. दिल्लीत केंद्रीय सचिवालय, संसदेचे ग्रंथालय, दिल्ली विद्यापीठ, जेएनयु आदी ठिकाणी प्रत्येक भाषेतील निवडक ग्रंथसंपदेच्या खरेदीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचे बजेट असते.केंद्रीय सचिवालयात मराठी भाषेसाठी पूर्वी स्वतंत्र ग्रंथपालही असे. दिल्लीत दोन लाखांहून अधिक मराठी भाषकांचे वास्तव्य आहे. त्यांना मराठी पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी कोणाचेही लक्ष नाही. नॅशनल बुक ट्रस्टमध्ये सुषमा सोनक, राहुल कोसंबींसारखे उत्साही कार्यकर्ते होते तेव्हा दिल्लीत मराठीविषयी किमानपक्षी काहीतरी घडत होते. आता या बाबतीत सारा शुकशुकाटच आहे.आतबट्ट्याचा व्यवहारविश्व पुस्तक मेळ््याबाबत मराठी प्रकाशकांमध्ये अनास्था का? याचा शोध घेतला असता जी कहाणी समजली ती थोडी अर्थकारणाशी संबंधित आहे. नऊ दिवसांच्या ग्रंथयात्रेत येथे सर्वात लहान स्टॉलचे एकूण भाडे ३५ हजार रुपये आहे. याखेरीज पुस्तकांची वाहतूक, पॅकिंग व सेल्समनच्या निवास, भोजन इत्यादी व्यवस्थेचा ३० ते ४० हजारांचा खर्च होतो. मेळ््यात मराठी पुस्तकांची फारतर ३० ते ४० हजारांची विक्री होते. या आतबट्ट्याच्या व्यवहाराला मराठी प्रकाशक तयार नाहीत. राज्य शासनाने त्यात थोडा पुढाकार घेतला, मराठी भाषेच्या संवर्धनाला मदत करण्यासाठी काही ठोस पावले उचलली तर कदाचित हे चित्र बदलू शकते.