शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मराठी टक्क्यासाठी आटापिटा

By admin | Updated: February 2, 2015 08:54 IST

अरविंद केजरीवाल यांनी नाकी नऊ आणल्यामुळे धास्तावलेल्या भाजपाश्रेष्ठींनी आता प्रादेशिक व भाषिक फासे टाकायला सुरुवात केली आहे

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीअरविंद केजरीवाल यांनी नाकी नऊ आणल्यामुळे धास्तावलेल्या भाजपाश्रेष्ठींनी आता प्रादेशिक व भाषिक फासे टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून मराठी टक्का आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह आजी-माजी मंत्र्यांना पक्षाने प्रचाराच्या मैदानात उतरविले आहे.दिल्लीतील मराठी मते भाजपाला खुणावू लागली आहेत. प्रादेशिक व भाषिक रणनीतीचा भाग म्हणून रावसाहेब दानवे आणि सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मराठी टक्का भाजपाकडे आकर्षित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. राजधानीत जवळपास चार लाख ८० हजार मराठी भाषिक असून, सुमारे ४० मतदारसंघांत मराठी टक्का विखुरलेला आहे़ तो टक्का आपल्या झोळीत पडावा, यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे.येथील मराठा मित्र मंडळाच्यावतीने रविवारी मेळावा झाला. दानवे व पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास सुमारे एक हजार मराठी नागरिक उपस्थित होते. एकमेकांना तीळगूळ भरवत दिल्लीत ‘आप’वर संक्र ांत आणण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. पुणे ते कोल्हापूरपर्यंतच्या दिल्लीत स्थलांतरित झालेल्या सुवर्णकार व्यावसायिकांना आकर्षित करण्याची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपवली. दिल्लीत अशा प्रकारचे १० मेळावे घेणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.