ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. २३ - आसाममधील माओवाद्यांनी सोनितपूर आणि कोकराजघर येथील ४० ग्रामस्थांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. सुरक्षा दलाच्या कारवायांच्या निषेधार्थ माओवाद्यांनी हे क्रूरकृत्य केले आहे.
आसाममधील नॅशनल डेमोक्रेटीक फ्रंट ऑफ बोडोलँड या माओवादी संघटनेच्या सशस्त्र गटाने सोनितपूर आणि कोकराझर जिल्ह्यातील दोन गावांमध्ये हल्ला केला. माओवाद्यांनी ग्रामस्थांवर गोळीबार केला व यामध्ये सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला. सोनितपूर येथील गावावर झालेल्या हल्ल्यामध्ये काही महिलांचाही मृत्यू झाल्याचे समजते.