शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एनएडीटीवर अनेक राज्यांची नजर

By admin | Updated: October 14, 2015 00:25 IST

नवीन जागेसाठी प्रयत्न सुरू

नवीन जागेसाठी प्रयत्न सुरू
राज्य सरकारची उदासीनता कायम
नागपूर : नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(एनएडीटी)च्या नागपुरातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकॅडमीसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे. यासंदर्भात राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रीय यांना पत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र त्यानंतर काहीच निष्पन्न झाले नसून याबाबत हालचाली होतांना दिसत नाही. दुसरीकडे देशातील इतर राज्यांचे लक्ष याकडे लागले असून, येथील नेत्यांनी संबधित शासनाला एनएडीटीसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत एनएडीटीशी पत्रव्यवहार करण्याचे आवाहन केले आहे.
छिंदवाडा रोडवर एनएडीटीची संस्था असून येथे आयआरएससाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. ही नागपूरसाठी गर्वाची बाब आहे. आयकर विभागाच्या सहायक आयुक्तापासून मुख्य आयकर आयुक्तांसारख्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिल्या जाते. यासोबतच रेल्वे, कस्टम एक्साईज तसेच संरक्षण विभागाचे लेखा अधिकारीही येथूनच प्रशिक्षण घेतात. ही संस्था १५० एकरमध्ये पसरली आहे. मात्र आता ही संस्था शहरात राहील की, नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कामाचा भार वाढल्यामुळे संस्थेला विस्तार योजनेसाठी अधिक जागेची आवश्यकता आहे. यासाठी संस्थेच्या समोर असलेली प्रादेशिक मनोरुग्णालयाची ३५ एकर जमिनीची निवड करण्यात आली आहे. संस्थेने सरकारकडे या जागेसाठी मागणी केली आहे. मात्र या जागेवर जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा सरकारने आधीच केली असल्याने सरकारचीही अडचण वाढली आहे. अशावेळी जमीन मिळाली नाही तर दुसऱ्या ठिकाणी जागा शोधण्याशिवाय एनएडीटीकडे पर्याय उरणार नाही. एनएडीटीची आवश्यकता लक्षात घेत इतर राज्यांनी याचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आपल्या राज्यात जमीन देण्याची तयारीही दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका राज्याच्या एका मोठ्या नेत्याने तर, एनएडटीकडून पत्र मिळाल्यास तासाभरात जमीन देण्याचा दावा केला आहे.

विकासासाठी जमीन आवश्यकच
संस्थेत संसाधन विकसित करुन आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी अतिरिक्त जमिनीची मागणी केली जात आहे. या जागेवर फुटबॉल, हॉकीचे मैदान तसेच मनोरंजन केंद्र निर्माण करायचे आहे. याशिवाय नवीन वसतिगृहाचे निर्माण करणे आवश्यक आहे, कारण आता हजाराच्या वर अधिकारी येथे प्रशिक्षण घेत असून सध्या जे वसतिगृह उपलब्ध आहे त्यात केवळ ३५० प्रशिक्षणार्थींना राहण्याची क्षमता आहे.