शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही- मनोहर पर्रिकर

By admin | Updated: June 18, 2017 20:56 IST

बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वाना आहे; परंतु कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 18 - बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वाना आहे; परंतु कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी आझाद मैदानात क्रांतिदिन कार्यक्रमात रविवारी दिला. रामनाथी-फोंडा येथे झालेल्या हिंदू जहालवाद्यांच्या संमेलनात बीफ मुद्द्यावरून झालेल्या प्रक्षोभक भाषणांच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. परंतु त्याचा कोठेही थेट उल्लेख त्यांनी केला नाही. मुख्यमंत्री म्हणाले, काहीजण गोव्यात येतात आणि काही विषय उपस्थित करतात, ज्याचा गोव्याशी काहीही संबंध नसतो. या विषयांवर राज्याची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही कायदा पाळणारे आहोत. रामनाथी येथे नुकत्याच झालेल्या हिंदू संमेलनात छिंदवाडा (मध्यप्रदेश) सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या अध्यक्षा साध्वी सरस्वती यांनी बीफ खाणा-यांना भर चौकात फासावर लटकवा, असे प्रक्षोभक विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत असल्याचे स्पष्ट होत होते. गोव्यात येऊन कोणीही काहीही बोलले तर त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे नाही; कारण बोलण्याचा अधिकार सर्वानाच आहे. कायदा सुव्यवस्था राखणे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे याची सरकारला जाणीव आहे. काहीजण मुद्दाम गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर काहीवेळा नकळत तो निर्माण होतो. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो; परंतु कोणी कायदा हातात घेत असेल तर गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.