शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 05:38 IST

पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले व पर्रीकर यांनीही दिलखुलासउत्तरे देत हास्याचे कारंजे फुलविले.

पणजी : मी लहानपणी हायस्कुलमध्ये जात होतो, तेव्हा आणि नंतरही गणित हा माझ्या आवडीचा विषय होता. मला गणितात शंभरापैकी ९९ गुण मिळत होते; मात्र मी कधीच गणिताचा अभ्यास करत नसे. मला गणिते सहज सुटत होती, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले व पर्रीकर यांनीही दिलखुलासउत्तरे देत हास्याचे कारंजे फुलविले. ते म्हणाले, मी अकरावीत असताना माझ्या शिक्षकांनाच काही गणिते घातली. ती त्यांना सोडविता आली नव्हती. शाळेत असताना मला अभ्यास करत बसावे लागले नाही. मी युनिव्हर्र्सिटीमध्ये गोव्यात दुसरा आलो होतो. त्यावेळी माझे गुण ७१ टक्के होते. आता बहुतेक विद्यार्थी दहावीला वगैरे ९९ टक्के गुण प्राप्त करतात. आताची सगळीच मुले हुशार आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही शिक्षण सोपे केले आहे. त्यामुळे हल्ली कोणीही ९९ टक्के गुण प्राप्त करतात, असे पर्रीकर हसत-हसत म्हणाले!मर्सिडिजमधून फिरण्याची इच्छा!तुमच्या अशा कोणत्या इच्छा होत्या, ज्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, असे मुलांनी विचारले असता पर्रीकर म्हणाले की, लहानपणी मला वाटायचे की माझ्याकडे मर्सिडिज गाडी असायला हवी.त्यामुळे खूप शिकावे व नोकरी किंवा व्यवसाय करून खूप पैसा मिळवावा व प्रथम मर्र्सिडीज खरेदी करावी, असे ठरविले होते.ती इच्छा यापुढे पूर्ण होईलही; पण सध्या मी आर्थिकदृष्ट्या योग्य स्थितीत असूनदेखीलमला इच्छा पूर्ण करता येत नाही.कारण मी राजकारणात आहे. राजकीय नेत्यांनी मर्सिडिज कारमधून फिरणे हे योग्य ठरणार नाही.राजकारण्यांनी ७०व्या वर्षी निवृत्त व्हावे!-राजकारण्यांनी कधी निवृत्त व्हावे असे तुम्हाला वाटते, या प्रश्नावर पर्रीकर म्हणाले की, कुठल्याही राजकारण्याने त्याच्या वयाच्या ६५व्या वर्षी स्वत:च्या आरोग्याचा व शारीरिक क्षमतेचा एकदा आढावा घ्यावा.वयाच्या ६५व्या वर्षी निवृत्त होता आले नाही, तर ७०व्या वर्षी तरी निश्चितच आरोग्याचा आढावा घेऊन निवृत्त व्हावे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरchildren's dayबालदिन