शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहनसिंग यांची दिशाभूल केली गेली

By admin | Updated: May 22, 2017 03:28 IST

माजी कोळसा सचिव एस. सी. गुप्ता यांनी अप्रामाणिकपणे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, असा निष्कर्ष विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माजी कोळसा सचिव एस. सी. गुप्ता यांनी अप्रामाणिकपणे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, असा निष्कर्ष विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांनी केला आहे.मध्यप्रदेशातील थेसगोरा-बी रुद्रापुरी कोळसा क्षेत्रातील खाणीचा पट्टा कमल स्पाँज स्टील अँड पॉवर लिमिटेडला वाटप करण्यात अनियमितपणा केल्याबद्दल न्या. पाराशर यांनी गुप्ता यांना दोषी ठरविले आहे. तत्कालीन कोळसा सचिव गुप्ता यांनी लबाडीने यासंदर्भात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना चुकीची माहिती दिली, असे न्या. पाराशर यांनी म्हटले आहे. चिकित्सा समितीच्या शिफारशींच्या आधारावर त्यांना कार्यवाही करावी लागणार होती. गुप्ता हे या समितीचे अध्यक्ष होते. तेव्हा माजी पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले नाही, असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. समितीने केलेल्या शिफारशींवर कोळसा मंत्रालयाने पात्रतेच्या अनुषंगाने अर्ज तपासले असावेत आणि समितीने मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतत पालन केले असेल, असे समजूनच मनमोहनसिंग यांनी पुढील कार्यवाहीबाबत विचार केला, असेही न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.चिकित्सा समितीच्या शिफारशींची फाईल पाठविताना कोणत्याही अधिकाऱ्याने पात्रता आणि परिपूर्णता या अनुषंगाने अर्ज तपासण्यात आलेले नाहीत, असा कुठेही उल्लेख नव्हता, असेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. कोळसा खाणपट्टा वाटप प्रकरणातील गैरप्रकारप्रकरणी गुप्ता यांच्यासोबत के. एस. क्रोफा आणि के. सी. समारिया यांनाही विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे.