मनमाडला दुकानाला आग लागून दिड लाख रुपयांचे नुकसान
By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST
मनमाड: येथील अमरातारा परिसरात नववर्षाचा जल्लोष सुरू असताना फटाक्यांची ठिणगी पडून दुकानाला लागलेल्या आगीत दिड लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला आहे.
मनमाडला दुकानाला आग लागून दिड लाख रुपयांचे नुकसान
मनमाड: येथील अमरातारा परिसरात नववर्षाचा जल्लोष सुरू असताना फटाक्यांची ठिणगी पडून दुकानाला लागलेल्या आगीत दिड लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला आहे. सुनिल झुंबरलाल शर्मा रा: मनमाड यांनी मनमाड शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या कटलरी दुकानाच्या परिसरात रात्री अज्ञात युवक नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष करत होते. या वेळी सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमधे फटाक्याची ठिणगी दुकानावर पडल्याने आग लागली. या आगीमधे कटलरी दुकानातील वस्तू जळून एक लाख चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मनमाड शहर पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.नि. भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. (वार्ताहर)