शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मणिपूरचे अपूर्ण विकास कार्य दिल्लीत बसून पूर्ण करणार

By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST

मणिपूरचे अपूर्ण विकास कार्य

मणिपूरचे अपूर्ण विकास कार्य
दिल्लीत बसून पूर्ण करणार
जोरदार स्वागत : मोदींनी जाहीर सभेत घेतला निरोप
नंदकिशोर पुरोहित/मणिनगर : मणिनगरच्या विकासाचे स्वप्न मी आणि येथील जनतेने एकत्रितरीत्या बघितले आहे. काही काम झाले, काही काम बाकी आहे. यापुढे मणिनगरचे अपूर्ण विकास कार्य दिल्लीत बसून पूर्ण करणार, अशी ग्वाही पंतप्रधान नियुक्त नरेंद्र मोदी यांनी निरोपाच्या सभेत दिली. मोदींना निरोप देण्यासाठी मणिनगरवासीयांनी एकच गर्दी केली होती. ‘मोदी मोदी’च्या नार्‍यांनी आसमंत दुमदुमला होता.
पक्ष कार्यालयात जाऊन लोकांना भेटण्याच्या तयारीने आलो होतो. येथील विशाल जनसमुदाय प्रतीक्षा करीत असल्याचे बघून बोलतो आहे, असे ते म्हणाले. रात्री 8 वाजून 7 मिनिटांनी मोदींचे सभास्थळी आगमन झाले तेव्हा गायक योगेश गढवी आणि त्यांचे सहकारी ‘भारत माता की जय’चे नारे देण्याचे आवाहन करीत होते. मात्र मोदी व्यासपीठावर येताच त्यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. बुथस्तरावरील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. मी मणिनगरची जनता आणि मोदींदरम्यान भिंत बनणार नाही, एवढे बोलून अमित शाह यांनी भाषण संपवले. लोकांची ताणली गेलेली उत्सुकता हे त्यामागचे कारण होते.
सप्टेंबरपासून देशभर भाषणांची मालिका कायम ठेवणार्‍या मोदींनी विधानसभेचे प्रतिनिधी या नात्याने अखेरचे भाषण करताना स्थानिक जनतेचे आभार मानले. 2012 मध्ये विधानसभेत निवडून आल्यानंतर मणिनगरमध्ये झालेल्या पहिल्या सभेतही ‘मोदी पीएम, मोदी पीएम’ हे नारे लागले होते. त्यावेळी मी आमदार होतो. तथापि, जनताजनार्दनाने मला पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दाखविले. जनतेसमोर कुणाचे चालणार? म्हणून माझे चालेल? असे म्हणत त्यांनी भावनिक साद घातली. 2015 मध्ये मणिनगरच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल त्यांनी शताब्दी वर्ष विकासपर्व म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले.
अमित शाह यांची प्रशंसा..
आपले खास विश्वासू अमित शाह यांची प्रशंसा करताना मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. ‘गुजराती देश के किसी भी कोने में जाएगा, सफलता के झंडे गाड़कर ही लौटेगा’ असे उद्गार त्यांनी काढले. शाह यांनी उत्तर प्रदेशात भाजपला मिळवून दिलेले यश पाहता काँग्रेसला संपूर्ण देशातही तेवढय़ा जागा मिळविता आल्या नाही, असे ते म्हणाले.
आतषबाजीने उजळले आकाश..
मोदींच्या भाषणानंतर भाजपने केलेल्या नेत्रदीपक आतषबाजीने आकाश उजळून निघाले. तिरंगी फुगे सोडण्यात आले तेव्हा मोदींच्या नावाचा जयजयकार सुरू होता. मणिनगरचा तारा दिल्लीत चमकणार, अशी सदिच्छा देत लोक निरोप घेत होते.