शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांच्या खात्यांत हेराफेरी

By admin | Updated: January 20, 2017 04:26 IST

नोटाबंदीनंतर सहकारी बँकांतील खात्यांत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त करणारे पत्र आयकर विभागाने रिझर्व्ह बँकेला पाठविले आहे

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर सहकारी बँकांतील खात्यांत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त करणारे पत्र आयकर विभागाने रिझर्व्ह बँकेला पाठविले आहे. आयकर विभागाने तयार केलेल्या विश्लेषण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यात पुणे आणि मुंबईतील दोन बँकांची उदाहरणे देण्यात आली आहेत. या बँकांनी कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर देव-घेव केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, काळ्या पैशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुण्याच्या एका बँकेने आपल्याकडे जुन्या नोटांत २४२ कोटी रुपये असल्याची माहिती दिली. वास्तविक बँकेकडे फक्त १४१ कोटी रुपयेच होते. याचा अर्थ जुन्या नोटांत आपल्याकडे १0१.७0 कोटींची जास्तीची रक्कम बँकेने २३ डिसेंबर रोजी दाखविली. मुंबईतील बँकेनेही अशाच प्रकारे ११.८९ कोटींची जास्तीची रक्कम आपल्याकडे दाखविली. नोटाबंदीनंतर आयकर विभागाने या दोन्ही बँकांचा सर्व्हे केला होता. त्यात बँकेकडे उपलब्ध असलेल्या नोटा आणि रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेली माहिती यात तफावत आढळून आली. अधिकाऱ्याने सांगितले की, आपल्याकडे जास्तीच्या नोटा असल्याचा अहवाल दिल्यामुळे या बँका ३0 डिसेंबरनंतरही जुन्या नोटा बदलून देऊ शकतात. आयकर विभागाने सहकारी बँकांच्या कामकाजाबाबत यापूर्वीही गंभीर चिंता व्यक्त केली होती. ८ नोव्हेंबर रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. बंद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३0 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती.