महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले
By admin | Updated: August 3, 2015 22:31 IST
सोलापूर : कामाला लावण्याचे कारण सांगून एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल पळवला. रविवारी सकाळी ९ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कठड्यावर हा प्रकार घडला.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले
सोलापूर : कामाला लावण्याचे कारण सांगून एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल पळवला. रविवारी सकाळी ९ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कठड्यावर हा प्रकार घडला. रेणुका हणमंतू संगटे (वय ३०, रा. धाकटी इरण्णा वस्ती, सोलापूर) या सात रस्ता भागातून जात असताना चोरट्याने त्यांना अडवले. तिला नोकरीचे आमिष दाखवून जबरदस्तीने रिक्षात बसवले. तेथून तिला त्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आणले. मंगळसूत्र नव्याने गाठून देतो, असे सांगून गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाईल पळवला. रेणुका संगटे यांनी पोलिसांमध्ये रीतसर फिर्याद दिली असून, तपास हवालदार कांबळे करीत आहेत. (प्रतिनिधी)