शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाच्या रणभूमीत बदललं मध्यप्रदेशातील मंदसौर

By admin | Updated: June 8, 2017 09:21 IST

मंदसौरचा प्रदेश एखाद्या युद्धभूमीसारखा दिसायला लागला आहे.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ/इंदोर, दि. 8 : मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात शेतकरी संपाती धग दिवसेंदिवस वाढत  जाते आहे. शेतकऱ्यांचं त्यांच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. मंदसौरचा प्रदेश एखाद्या युद्धभूमीसारखा दिसायला लागला आहे. बुधवारी पिपलियामंडीमध्ये हजारो आंदोलनकर्त्यांनी  संचारबंदी लागू असताना त्याचं उल्लंघन करत डीएम आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली तसंच गाड्या आणि वेअरहाऊस पेटवून दिली. इतकंच नाही तर तेथील दारूची दुकानसुद्धा लुटण्यात आली. संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या पंधरा पेक्षा जास्त लक्झरी बसेस जाळून टाकल्या, बसमधून काही जण प्रवास करत होते. या जाळपोळीनंतर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रवासी जवळच्या शेतात जाऊन लपले, अशी माहिती तेथील स्थानिक पत्रकारांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्यामध्ये 12 ते 15 पोलीस जखमी झाले आहेत तर पोलीस अधिकारी आर.बी.शर्मा गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो आहे. 
 
 
 
मंदसौरमधील वातावरण सध्या अत्यंत खराब झालं आहे. जी लोक आंदोलनात सहभागी होत नाही आहेत अशा लोकांवरसुद्धा निशाणा साधला जातो आहे. मंदसौरचा राज्याच्या दुसऱ्या भागांशी संपर्क तुटला आहे. राजकीय नेत्यांनासुद्धा मंदसौरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. मध्यप्रदेश भाजपचे प्रमुख नंदकुमार सिंह चौहान आणि कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांना मंदसौरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं, तर काँग्रेसच्या माजी मंत्री मीनाक्षी नटराजन यांनासुद्धा सुअसरा गावात जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
 
 
बरखेडा पंथ गावात एका मृत शेतकऱ्याच्या अंत्ययात्रे दरम्यान हल्ले सुरू झाले होते.  मंदसौरचे डीएम स्वतंत्र कुमार सिंह यांनी निदर्शनाच्या जागेवर जाऊन लोकांना समजविण्याता प्रयत्न केला होता पण तेथे त्यांना धक्काबुक्की झाली. डीएला जेव्हा तिथून नेलं जात होतं तेव्हा संतापलेल्या लोकांनी टोलनाक्याला आग लावली आणि पोलिसांवरसुद्धा दगडफेक केली. कापसाच्या एका कारखान्यालासुद्धा संतप्त जमावाने आग लावली होती. आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेड आलं पण त्यांनासुद्धा जमावाने पळवून लावलं आणि गाडीच्या काचा फोडल्या. 
 
मंदरौसमधील पाच किलोमीटर लांब बायपास आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला होता. मोठ्या वाहनांची लुटालुटही करण्यात आली. मंदसौरमधील परिस्थिती कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांवरसुद्धा हल्ले करण्यात आले आहेत.