शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

'ममता बॅनर्जींची वागणूक 'किंग जोन उन'सारखी, विरोधकांच्या हत्येचा घाट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 08:43 IST

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांत मतदान घेण्यात आले

ठळक मुद्देभाजपा नेते आणि खासदार गिरीराजसिंह यांनी ममत बॅनर्जींच्या वागणुकीला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची उमपा दिलीय. 

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठीच्या (West Bengal Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. येथील 294 जागांपैकी 30 जागांसाठी होत असलेल्या मतदानासाठी मतदाता मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसून आले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे, तृणमूल काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये घमासान पहायला मिळत असून आरोप प्रत्यारोपाच्याही फैरी झडत आहेत. भाजपा नेते आणि खासदार गिरीराजसिंह यांनी ममत बॅनर्जींच्या वागणुकीला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची उमपा दिलीय. 

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाल्याचं सांगण्यात आल होतं. तर, नुकताच टीएमसी सोडून भाजपचा भगवा हाती घेतलेले शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी यथे हल्ला झाला आहे. मात्र, यावेळी सौमेंदू कारमध्ये नव्हते. या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. यानंतर या हल्ल्याचा आरोप टीएमसीवर करण्यात येत आहे. त्यावरुन, गिरीराजसिंह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.  शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला झाला असून ममता बॅनर्जींच्या निराशेचं हे कारण आहे. ममता बॅनर्जी या सीपीएमविरोधात सत्तेत आल्या, पण आता सीपीएमपेक्षाही त्या पुढे गेल्या आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनप्रमाणे त्या वागत आहेत. आपल्या विरोधकांना संपवून टाकण्याचा त्यांचा डाव आहे. त्या, आपल्या विरोधकांना जिवंत ठेवू इच्छित नाहीत.  2 मे रोजी याचा सुफडा साफ होईल, असे गिरीराजसिंह यांनी म्हटलंय. 

टीएमसी नेत्यावर आरोप -

सौमेंदू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ दिब्येंदू अधकारी यांनी आपल्या भावाच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासाठी टीएमसी नेत्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले, मला माहिती मिळाली आहे, की टीएमसीच्या ब्लॉक अध्यक्षाने सौमेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला करवला. यात कारचालकालाही मारहाण करण्यात आली आहे. यात कारचालक जखमी झाला आहे. कारवर झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

कोशियारीत भाजपा कार्यकर्त्याचा आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. "घरात घुसून झोपलेल्या भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली" असं म्हटलं आहे. रात्री मंगल सोरेन बाहेर झोपला होता, सकाळी त्याचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळला असं सांगितलं जात आहे. भाजपा उमेदवार सोनाली मुर्मु यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी असं ऐकायला मिळालं, की बेगमपूर चार नंबर बूथवर एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्याची हत्या करण्यात आली आहे. रात्री तो घराबाहेर झोपला होता, मात्र सकाळी त्याच्या आईला त्याठिकाणी त्याचा मृतदेह दिसला."

कूचबिहार क्षेत्रात फासावर लटकलेला मृतदेह

बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात (Coochbehar) दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. तसेच "राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे" असं देखील भाजपाने म्हटलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीKim Jong Unकिम जोंग उनElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१