शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

सुट्टीच्या दिवशी मल्ल्यांना कर्ज मंजूर

By admin | Updated: January 29, 2017 23:34 IST

मद्यसम्राट विजय मल्ल्या व आयडीबीआय बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) योगेश अग्रवाल यांच्यात सुट्टीच्या दिवशी झालेल्या बैठकीनंतरच बँकेने किंगफिशर एअरलाइन्सला..

नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या व आयडीबीआय बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) योगेश अग्रवाल यांच्यात सुट्टीच्या दिवशी झालेल्या बैठकीनंतरच बँकेने किंगफिशर एअरलाइन्सला कर्जाच्या पहिल्या दोन हिश्श्यापोटी ३५० कोटी रुपये दिले, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे.

ही माहिती देताना ईडीने स्पष्ट केले की, किंगफिशरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही, मल्ल्या आणि अग्रवाल यांनी गुन्हेगारी कट रचून ही कर्ज रक्कम मंजूर करवून घेतली. या अंतर्गत आयडीबीआय बँकेने एकूण ८६०.९२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर आणि वितरित केले. या कर्जाची रचना आणि पुनर्रचना करताना, ज्या प्रकारची प्रक्रिया अवलंबिण्यात आली, त्यावरून असे दिसते की, मल्ल्या यांचा कर्ज परतफेडीचा हेतू नव्हता. कर्जाच्या तारणस्वरूपात ज्या वस्तू अथवा मालमत्ता दाखविण्यात आल्या, त्याचे बाजारमूल्य आणि गुणवत्ता याची तपासणी करण्यात आली नाही. कर्जाचे पहिले दोन हिस्से देताना खूप घाई करण्यात आली.

या एजन्सीने म्हटले की, या प्रकरणात बँक अधिकारी आणि एअरलाइन्सचे प्रवर्तक यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान रचले होते. आॅक्टोबर २००९ मध्ये मल्ल्या यांनी बँक अधिकाऱ्यांना फोन करून दुसऱ्याच दिवशी बैठक घेण्याबाबत सुचविले होते. आणखी एक दिवसाने सुट्टी असल्याने, त्या दिवशी बैठक घेऊ, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले, पण आपल्याला बाहेरगावी जायचे असून, दुसऱ्याच दिवशी बैठक घेतली तर आभारी राहू, असे मल्ल्यांनी सांगितले.

अग्रवाल म्हणाले की, दुसऱ्या दिवशी बँकेचे एक माजी एमडी, सल्लागार, एक कार्यकारी संचालक यांच्यासह त्यांनी मल्ल्यांसोबत चर्चा केली. मल्ल्यांनी सांगितले की, किंगफिशर संकटात आहे, पैशांची आवश्यकता आहे. एजन्सीने असेही म्हटले आहे की, बँकेने स्वतंत्र सत्यापनाशिवाय किंगफिशरचे ३,४०० कोटींचे मूल्यांकन मान्य केले. बँकेने ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले आणि किंगफिशरने त्यातील ४२३ कोटी देशाबाहेर नेले. मल्ल्या आणि अग्रवाल यांच्यात सुट्टीच्या दिवशी झालेल्या बैठकीनंतरच कर्जाचे वितरण झाले. ७ आॅक्टोबर २००९ रोजी १५० कोटी रुपये, ४ नोव्हेंबर २००९ रोजी २०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. सीबीआयने अलीकडेच या प्रकरणात अग्रवाल आणि अन्य आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे.