शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

मल्ल्या यांच्याविरुद्ध नवा गुन्हा दाखल

By admin | Updated: August 14, 2016 02:01 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाकडून (एसबीआय) घेतलेल्या १६०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीतील कथित अनियमिततेबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने विजय मल्ल्या

नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियाकडून (एसबीआय) घेतलेल्या १६०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीतील कथित अनियमिततेबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध नवा गुन्हा दाखल केला आहे. एसबीआयने तक्रार केल्यानंतर मल्ल्या व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जाची पुनर्रचना करताना मल्ल्या यांनी खरी माहिती दडविल्याचा एसबीआयचा आरोप आहे. मल्ल्यांच्या उड्डयन कंपनीने २०१० मध्ये दुसऱ्यांदा कर्ज पुनर्रचना करून १७ कर्ज पुरवठादारांच्या महासंघाकडून ६,९०० कोटी रुपये घेतले होते. एसबीआयने किंगफिशर एअरलाइनला १६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये बँकेने कर्जासाठी तगादा लावत कर्जापोटी गहाण ठेवलेले युबी ग्रुप कंपनीमधील शेअर्स विकले. तथापि, त्यातून केवळ ११०० कोटी रुपये गोळा होऊ शकले. पंजाब नॅशनल बँक व आयडीबीआय बँकेचे मल्ल्यांच्या कंपनीकडे प्रत्येकी ८०० कोटी रुपये असून, बँक आॅफ इंडियाचे ६५० कोटी, बँक आॅफ बडोदाचे ५५० कोटी, तसेच सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे ४१० कोटी रुपये थकले आहेत. याशिवाय युको बँकेला त्यांच्याकडे ३२० कोटी रुपयांचे येणे असून, स्टेट बँक आॅफ म्हैसूर (१५० कोटी), इंडियन ओव्हरसिज बँक (१४० कोटी), फेडरल बँक (९० कोटी), पंजाब अँड सिंध बँक (६० कोटी), तसेच अ‍ॅक्सिस बँक ५० कोटी रुपये एवढे येणे लागते. बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवून मल्ल्या फरार झाले आहेत. कर्जाची परतफेड न करणे आणि ईडीसमोर हजर न झाल्याबद्दल विजय मल्ल्या यांना फरार घोषित करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पासपोर्ट आधीच झाला रद्दबँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवून मल्ल्या फरार झाले असून, बँकांच्या कर्जाची परतफेड न करणे आणि सक्तवसुली संचालनालयासमोर हजर न झाल्याबद्दल त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचा पासपोर्टही रद्द केला आहे.