शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

मालेगाव बॉम्बस्फोट खटला : लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहितना अखेर नऊ वर्षांनी जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 6:00 AM

नवी दिल्ली : मालेगाव येथे सप्टेंबर २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील एक आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितना सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अखेर जामीन मंजूर केला.एटीएस विशेष न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर कर्नल पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. आर. के. अगरवाल व न्या. ...

नवी दिल्ली : मालेगाव येथे सप्टेंबर २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील एक आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितना सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अखेर जामीन मंजूर केला.एटीएस विशेष न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर कर्नल पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने ते मंजूर करून एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. न्यायालयात हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, साक्षी-पुराव्यांमध्ये ढवळाढवळ न करणे, पासपोर्ट जमा करणे व पूर्वानुमतीशिवाय देश सोडून बाहेर न जाणे अशा अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला. खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत पुरोहित निलंबितच राहतील, पण आता जामीन मिळाल्याने, त्यांना लष्कराच्या एखाद्या आस्थापनेशी औपचारिकपणे ‘अटॅच’ केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.या निकालपत्रात केलेले विवेचन व नोंदविलेले निष्कर्ष फक्त कर्नल पुरोहितच्या जामिनाचा निर्णय करण्यासाठी आहेत. विशेष न्यायालयाने इतर आरोपींच्या जामिनाचा विचार करताना किंवा अंतिमत: खटला चालविताना त्याची दखल न घेता गुणवत्तेवर निर्णय घ्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, तसेच कर्नल पुरोहित यांनी जामिनाच्या अटींचा भंंग केल्यास, तो रद्द करण्यासाठी एनआयए अर्ज करू शकेल, अशी मुभाही दिली गेली.या कारणांमुळे पुरोहित ‘बाहेर’एनआयएने सादर केलेले पुरवणी आरोपपत्र आणि महाराष्ट्र एटीएसने दाखल केलेले मूळ आरोपपत्र यातील तफावत, खटला लवकर संपण्याची शक्यता नसणे आणि पुरोहित यांचे आठ वर्षे आठ महिने तुरुंगात असणे या बाबी जामीन देताना न्यायालयाने नमूद केल्या. तपासी यंत्रणेला तपास करण्याचा अधिकार असला तरी आरोपीच्या स्वातंत्र्याचा एका मर्यादेपलीकडे अनाठायी संकोच केला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत आस्ते धोरण स्वीकारा, असे आपणास सांगण्यात आल्याची तक्रार काही काळापूर्वी सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनी केली होती. त्यानंतर त्या या खटल्यातून बाहेर पडल्या होत्या.जामीन मिळताच तळोजा कारागृहासमोर गर्दीतळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांची सुटका होणार असल्याची माहिती मिळताच दुपारी एकपासून प्रसार माध्यम आणि नागरिकांनी कारागृहासमोर गर्दी केली होती. दस्तावेजाची पूर्तता न झाल्याने पुरोहित यांची सुटका एक दिवस लांबली.काँग्रेसची टीकाकर्नल पुरोहितच्या जामिनावर झालेल्या सुटकेवरून काँग्रेसने भाजपा व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपींना सोडण्यासाठी केंद्र सरकारने एनआयएचा वापर केला, एनआयएच्या प्रमुखांना दोनदा मुदतवाढ दिली आणि निवृत्तीनंतरही त्यांना बक्षीस दिले जाईल.- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसन्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याच्याशी सरकार वा भाजपाचा संबंध असूच शकत नाही. यात कसलेही कट कारस्थान नाही.- किरन रिजिजू, केंद्रीय गृहराज्यमंत्री