शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
3
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
4
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
5
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
6
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
7
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
8
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
9
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
10
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
11
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
12
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
13
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
14
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
15
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
16
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
17
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
18
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
19
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
20
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू

मनुचा व्हायला हवा ‘मेकओव्हर’!

By admin | Updated: May 11, 2017 03:25 IST

‘विनाकारण’ बदनाम केल्या केलेल्या मनुविषयीचे जनतेच्या मनातील भ्रम दूर करून, ‘मनुचा मेकओव्हर’ करण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंग असलेल्या ‘संस्कार भारती’ने केला असून

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘विनाकारण’ बदनाम केल्या केलेल्या मनुविषयीचे जनतेच्या मनातील भ्रम दूर करून, ‘मनुचा मेकओव्हर’ करण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंग असलेल्या ‘संस्कार भारती’ने केला असून, केंद्रीय संस्कृती मंत्रालयानेही तज्ज्ञ इतिहासकारांकरवी संशोधन करून सत्य जगासमोर आणावे, असा त्यांचा आग्रह आहे.संस्कार भारतीच सहसंघटनमंत्री अमीरचंद या संदर्भात म्हणतात की, ‘मनुस्मृती’च्या निमित्ताने टीकेची झोड उठवून मनुला बदनाम करण्याचा एकतर्फी प्रयोग भारतातातील विविध राजकीय पक्षांनी आजवर केला आहे. मनुवर होणारी ही टीका अर्धवट माहिती व अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे होत आहे. त्यामुळे मनुची उजळ बाजू समोर आणून त्याच्या व्यक्तिमत्वाचे ‘मेकओव्हर’ व्हायला हवे, असे आमचे म्हणणे आहे. मनुस्मृती व वेदांमधील काही संकल्पनांंबाबतचा अपप्रचार दूर करण्यासाठीही संशोधन करून सत्य जगासमोर आणणे गरजेचे आहे, असे अमीरचंद म्हणाले.मनुस्मृतीचा कालखंड आजपासून १८00 ते २४00 वर्षे जुना आहे तर मनुचा जन्म ८000 वर्षांपूर्वी झाल्याचे बहुतांश इतिहासतज्ज्ञ मानतात असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, मनुच्या जन्मानंतर तब्बल ५ हजार वर्षांनी अस्तित्वात आलेल्या मनुस्मृतीवरील टीकेचे खापर मनुवर फोडणे सर्वथा अयोग्य व अन्यायकारक आहे.मनुच्या इतिहासकालिन व्यक्तिमत्वाबरोबरच वेदांमधील काही संकल्पनांबाबतही जनतेत भ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही लोकांमार्फत केला जाता, असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, भारतीय संस्कृतीच्या मूलतत्वांकडे आजवर जे दुर्लक्ष झाले त्यात सुधारणा घडवण्याचे व हा भ्रम दूर करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे चर्चासंवाद, इतिहासकालिन विषयांवर कार्यशाळा, व व्यापक संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. संस्कार भारतीतर्फे ही मागणीही केंद्र सरकारकडे केली जाईल.