शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

राहुल गांधींना त्वरित अध्यक्ष बनवा !

By admin | Updated: November 1, 2016 03:03 IST

राहुल गांधी यांना त्वरित पक्षाध्यक्ष बनवायला हवे.

नवी दिल्ली : राहुल गांधी यांना त्वरित पक्षाध्यक्ष बनवायला हवे. त्याबाबत होणारी अटकळबाजी पक्ष आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य पाहता योग्य ठरत नाही, असे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केले आहे.राहुल गांधी यांना अध्यक्ष बनविण्याविषयी किंवा तशा प्रकारच्या दुसऱ्या ढाच्यात बसविण्याबाबत पक्षाने निर्णय घ्यावा. त्याबाबत अटकळी होत राहणे पक्षासाठी ठीक नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होते, असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी हे सातत्याने देशभरात लोकांच्या संपर्कात असून पक्षाला बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. आम्ही जनतेकडे पक्षाचे सामाजिक धोरण आणि विचार ठोसपणे मांडावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना काँग्रेसकडे आकर्षित केले जावे.१८ वर्षांचे युवक पहिल्यांदा मतदान करणार असून त्यांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडले जावे, यावर्षीच्या प्रारंभी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून उत्तर प्रदेश आणि पंजाब ही राज्ये महत्त्वाची ठरतात. उत्तर प्रदेशात आपल्याला चांगल्या रणनीतीसह पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागेल, तरच चांगला निकाल मिळू शकेल. पंजाबात गेल्या सहा महिन्यांमध्ये परिस्थिती खूप बदलली असून आमचे परिश्रम कामी आले आहेत.पक्षाचे मनोधैर्य आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे, असेही त्यांनी सांगितले. >आर्थिक सुधारणांची सूत्रधार काँग्रेसचआर्थिक सुधारणांची सूत्रधार काँग्रेसच असून त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मनमोहनसिंग १९९१ मध्ये अर्थमंत्री असताना आर्थिक सुधारणांना प्रारंभ झाला. आज आपण या सुधारणांचे रजतजयंती वर्ष साजरे करीत आहोत. मोदी सरकारने हाच आर्थिक सुधारणा कार्यक्रम पुढे नेण्याचे काम चालविले आहे. गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदा जनतेने एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत दिले आहे. मोदी सरकारकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या; मात्र त्या पूर्ण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून गेल्या अडीच वर्षांमध्ये या सरकारला कोणताही नवा आर्थिक किंवा सामाजिक विचार समोर आणता आलेला नाही. या सरकारने यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या योजनांचे रिपॅकेजिंगचे काम सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.