शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मटका कायदेशीर करा!

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

(वाघांच्या फोटोसह)

(वाघांच्या फोटोसह)
वाघ गुरगुरले : कॅसिनोंमधील उधळप?ी चालते, तर मटक्याला विरोध का?
पणजी : मटका जुगार कायदेशीर करा, अशी मागणी यापूर्वी क्वचितच एखाद्या आमदाराने विधानसभेत केली आहे. सांत आंद्रेचे आमदार तथा साहित्यिक विष्णू वाघ यांनी मात्र मंगळवारी विधानसभेत बोलताना मटका जुगार कायदेशीर करता येईल काय, या विषयी सरकारकडून विचार केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी मूळ प्रश्न फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांनी मांडला होता. अर्थात मटका कायदेशीर करा, अशी मामलेदार यांची मागणी नव्हती. फोंड्यात मटक्याविरुद्ध पोलीस जी कारवाई करतात, ती केवळ वरवरची असून फुटपाथवरील छोट्या मटका व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे नोंदविले जातात; पण मोठय़ा बुकींविरुद्ध कारवाई होत नाही. स्थानिक तरुणही मटक्यात गुंतलेले आहेत. जे बुकी फोंड्यातील सगळा मटका नियंत्रित करतात, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद झालेले नाहीत, असे मुद्दे आमदार मामलेदार यांनी मांडले. मटका वाढला असल्याचे सरकारी आकडेवारीवरून कळून येते, असेही मामलेदार यांनी नमूद केले. काही विशिष्ट कालावधीत पोलिसांना टार्गेट दिले जाते. त्यामुळे ते कारवाई केल्याचे व गुन्हे नोंदविल्याचे दाखवतात, असे मामलेदार म्हणाले.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मामलेदार यांचे हे म्हणणे मान्य केले नाही. मटका आता नियंत्रणात आहे, असा दावा पार्सेकर यांनी केला. उलट मटक्याविरुद्ध कारवाई वाढली आहे. खटलेही भरले जात आहेत. अधिकाधिक गुन्हे झालेले असल्याने त्या आधारे मटका नियंत्रणात आहे, असा निष्कर्ष काढता येतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांना टार्गेट देण्यासाठी हा काही डिसेंबर महिना नव्हे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मटका जुगार कधी बंद केला जाईल, अशी विचारणा मामलेदार यांनी केली. यावेळी आमदार वाघ यांनी एक उपप्रश्न मांडला. जे लोक लाखो रुपये घेऊन कॅसिनोमध्ये खेळतात, त्या कॅसिनोला कायदेशीर मान्यता आहे. तसेच तुम्ही मटक्याला कायदेशीर रुप का देत नाही, अशी विचारणा वाघ यांनी केली. मटका हा खूप विश्वासार्हततेवर चालतो. एका कागदाच्या तुकड्यावर जे आकडे लिहून दिले जातात, त्यानुसार मटका व्यवस्थित चालतो. तो कायदेशीर होईल, अशी भीती पोलिसांनाच दिसते, असे वाघ म्हणाले.
अर्थात वाघ यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री पार्सेकर यांनी काही भाष्य केले नाही. तत्पूर्वीच प्रश्नोत्तराचा तास संपला. (खास प्रतिनिधी)