शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सुखोई अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करा

By admin | Updated: July 8, 2017 01:01 IST

भारत-चीन सीमेजवळ झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

तिरुअनंतपुरम : भारत-चीन सीमेजवळ झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, आपल्या मुलाच्या मृत्यूविषयी त्यांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. फ्लाइट लेफ्टनंट अचुदेव आणि स्क्वॉड्रन लीडर डी. पंकज असलेल्या सुखोई विमानाला २३ मे रोजी भारत-चीन सीमेवर अपघात झाला होता. तीन दिवसांनंतर विमानाचे अवशेष आढळून आले. त्यानंतर दोन्ही शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात आले. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात, आपल्या घरी आलेल्या शवपेटीत त्यांच्या मुलाचे पार्थिव नव्हते. असा संशय व्यक्त केला आहे. दुर्घटनेत होरपळल्याने अचुदेव यांची ओळख करणे कठीण होते. त्यांच्या पार्थिवापाशी सैन्याला जे पाकीट मिळाले त्याआधारे अचुदेव यांची ओळख पटवण्यात आली, असे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र माझ्या मुलाची ओळख पटवणे अशक्य असेल, तर त्याच्या पाकिटातील रोख रक्कम व बँक कार्ड कसे व्यवस्थित राहिले, असा प्रश्न अचुदेवच्या वडिलांनी केला आहे. मृत्यूची सांगण्यात आलेली कारणे आणि देण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये तफावत आहे. या घटनेमागे कोणती तरी दुसरीच गोष्ट दिसत आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)कधी कोसळले?वायुसेनेने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान व वायुसेनेच्या प्रमुखांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. बेपत्ता सुखोई एसयू ३0 जेट फायटरला २३ मे रोजी अपघात झाला होता. तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले होते. हे विमान चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून आसाममधून बेपत्ता झाले होते. नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते बेपत्ता झाले होते.