हॉकर्सला स्थायी करा
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
हॉकर्सला स्थायी करा
हॉकर्सला स्थायी करा
हॉकर्सला स्थायी करा सीताबर्डी फुटपाथ दुकानदारांचा एल्गार : प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात धरणे नागपूर : महानगरपालिकेने केलेल्या लाल पट्ट्याच्या नियमानुसार सीताबर्डी येथील हॉकर्संना व्यवसाय करू द्यावा व त्यांना स्थायी करून सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सर्व हॉकर्सना पर्यायी व्यवस्थेशिवाय हटविण्यात येऊ नये, या मुख्य मागणीसाठी सीताबर्डी मेन रोड हॉकर्स फुटपाथ दुकानदार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे देण्यात आले. शहरात हॉकर्स धोरण निश्चित करा, शहरात ७० हॉकर्स झोन तयार करण्यात यावे, हॉकर्सना स्थायी ओळखपत्र देण्यात यावे, ४४०० हॉकर्सची शासनाद्वारे नोंदणी करून त्यांना आर्थिक पाठबळ म्हणून कर्ज देण्यात यावे, हॉकर्सकडून प्रत्येकी १५०० रुपये घेण्यात आले. त्या निधीमधून हॉकर्सला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि बर्डीतील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, आदी मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करीत मनपा व पोलीस प्रशासनावर जोरदार रोष व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा धरणे आंदोलन स्थळाला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस फुटपाथ दुकानदारांच्या बाजूने असून त्यांच्यावरील अन्याय सहन करणार नाही. वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी दुकानदारांना दिला. धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, संदीप मेंढे, आसिफ भाई, विजय गजभिये, वाजीद अली, श्रीकांत श्रीवास, इमरान अन्सारी, तिलक कुरील विनोद गुप्ता, चंदू अग्रवाल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. बॉक्स..पोलीस आयुक्त-मनपा आयुक्तांना भेटणार सीताबर्डी येथील हॉकर्सच्या मागण्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवारी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येईल. यासंबंधात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे आ. प्रकाश गजभिये यांनी आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत दिला. याप्रसंगी अविनाश तिरपुडे, गोपी आंभारे, इकबाल हाजी, संदीप शाहू, प्रमोद मिश्रा, बबलू खोडे, राजू राठी आदी उपस्थित होते.