शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरकर्मा शत्रुघ्न मेश्रामची फाशी कायम करा

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

शासनाची हायकोर्टास विनंती : चिमुकल्या भाचीचा अत्याचार करून खून

शासनाची हायकोर्टास विनंती : चिमुकल्या भाचीचा अत्याचार करून खून
नागपूर : दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्दयीपणे खून करणारा क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मेश्राम (२१) याची फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सादर केले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी सोमवारी आरोपीला नोटीस बजावून १४ सप्टेंबरपर्यंत वकिलामार्फत उपस्थिती दर्शविण्याचे निर्देश दिलेत. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे.
आरोपी हा संबंधित मुलीचा चुलत मामा असून तो झटाळा ता. घाटंजी येथील रहिवासी आहे. गेल्या १४ ऑगस्ट रोजी यवतमाळ सत्र न्यायालयाने आरोपीला दुहेरी फाशी व दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपीने हे माणुसकी व नात्याला काळीमा फासणारे कुकृत्य केले. त्या दिवशी संबंधित मुलीचे आई-वडील तिला गावातच राहणाऱ्या आजोबांकडे ठेवून मंदिरात महाप्रसादासाठी गेले होते. दरम्यान, शत्रुघ्न तिला आई-बाबा घरी आल्याचे सांगून सोबत घेऊन गेला. अर्ध्या तासाने आजोबा तिच्या घरी गेले असता ती घरी आली नसल्याचे कळले. जवळपास विचारपूस केली असता शत्रुघ्न तिला घेऊन अंगणवाडीकडे गेल्याचे समजले. वडील व आजोबाने अंगणवाडी गाठली असता तेथे ही चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. शत्रुघ्न तिच्या बाजूला पडलेला होता. चिमुकलीला बेशुद्धावस्थेत कुर्लीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पारवा पोलिसांनी वडिलाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार, खून व लैगिंक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. १२ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. तपासानंतर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने वडील, आजोबा, डॉक्टर यांच्यासह १३ साक्षीदार तपासले होते.
---------------------------
चौकट.....
अशी आहे आरोपीची शिक्षा
यवतमाळ सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. सी. चाफले यांनी आरोपीला भादंविच्या कलम ३७६ (अ) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३७६(१)(२)(फ)(आय)(एम) अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ६ अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.