शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख धरणे आटली; देश पाणीटंचाईच्या सावटाखाली

By admin | Updated: August 27, 2015 04:29 IST

पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने

नवी दिल्ली : पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे साहजिकच यंदा पाणीसंकट गहिरे होऊ शकते. पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी आगामी काळात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. देशातील प्रमुख धरण क्षेत्रात सध्या ९१ अब्ज घनमीटर पाणीसाठा असून तो वापरण्यायोग्य साठ्याच्या केवळ ५८ टक्के आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात १०३.५ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता, तर गेल्या १० वर्षांतील सरासरी ९८.७ अब्ज घनमीटरपेक्षाही यंदा पाणीसाठा कमी आहे. त्यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येऊ शकते.उत्तर व मध्य भारत वगळता देशातील जलाशयांतील पाणीसाठा समाधानकारक नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. पश्चिम भारतातील २७ प्रकल्पांमध्ये (महाराष्ट्र व गुजरात) १५.८९ अब्ज घन मीटर (५९ टक्के) पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या ६१ टक्के साठ्याच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक आहे, असे म्हणता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्रात गंभीर स्थिती, धरणात ५ टक्केच साठाराज्यातील १७ मोठ्या जलाशयांपैकी १३ प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा आहे. जायकवाडी, भीमा, येलदरी, गिरणा धरणांत तर केवळ ५ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.पूर्व भाग अडचणीतझारखंड, ओडिशा, प. बंगाल व त्रिपुरा या पूर्वेतील राज्यांतही दशकातील सरासरीपेक्षा कमी जलसाठा आहे. महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकात जलशयांतील पाणी पातळी घसरली आहे.