शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेय फाऊंडेशनमध्ये नगरकरांचे अडकले कोट्यवधी रुपये कंपनीचे स्थानिक कार्यालय बंद : गुंतवणूक करणार्‍या महिलांची वणवण भटकंती

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

अरुण वाघमोडे

अरुण वाघमोडे
अहमदनगर : मैत्रेय फाऊंडेशन प्रा़ लि़ या कंपनीत नगर शहरासह जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, वर्षभरापूर्वी या कंपनीने येथील मंगळवार बाजारातील कार्यालयही बंद केले आहे़ गेल्या सात वर्षांपासून गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावेत यासाठी अनेकांची वणवण भटकंती सुरू असून, कंपनीच्या अधिकार्‍यांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत़
मैत्रेय फाऊंडेशन या कंपनीत गेल्या सात वर्षांपासून गुंतवणूक केलेल्या २५ महिलांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ मैत्रेय फाऊंडेशनचे राज्यासह देशभरात विविध कार्यालय आहेत़ या कंपनीने सुवर्ण सिद्धी, प्लॉटस्, आणि रिलेटर अशा आकर्षक स्किमचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून मंथली, तिमाही, सहामाही आणि वार्षिक हप्त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळले़ सहा ते सात वर्षांपासून गुंतवणूक केलेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झालेला आहे़ त्यांना मात्र परतावा म्हणून एक रुपयाही मिळालेला नाही़ फाऊंडेशनच्या नगर येथील मंगळवार बाजारातील कार्यालयाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी १६ जुलै २०१० पासून गुंतणवणूक करण्यास सुरुवात केली़ मंथली १०० रूपयांपासून ते १० हजार रूपयांपर्यंत विविध स्किमच्या माध्यमातून ही गुंतवणूक होती़ चार वर्षात दीडपट ते सहा वर्षांत दुप्पट असे योजनांचे आमिष होते़ कंपनीकडून चांगला परतावा मिळणार असल्याने शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी मुलींच्या लग्नासाठी, घर बांधण्यासाठी अशा विविध कारणांसाठी कंपनीत पैसे गुंतविले तसेच या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत इतरांचेही पैसे घेऊन कंपनीत भरले़ पैसे भरलेल्यांमध्ये मात्र कुणालाच परत काहीच मिळाले नाहीत़ या कंपनीत प्रतिनिधी म्हणून काम करणार्‍या महिलांकडे ज्यांच्याकडून यांनी पैसे घेतले आहेत़त्यांनी तगादा लावला असून, या महिलाही हवालदिल झाल्या आहेत़ शहरातील माळीवाडा येथील अरुण भिंगारदिवे, शीला देवडे, शोभना भिंगारदिवे, सुनंदा जगताप, कल्पना भिंगारदिवे, सरस्वती नवगिरे, सीमा सोनवणे, भामा कांबळे, अग्नेश ओहोळ, वर्षा भिंगादिवे, सागर शिरसाठ यांच्यासह २५ जणांची स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून, या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे़
अपूर्ण़़़़़़़़़़़़