शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीवरील बंधारा कायम ठेवावा निवेदन : उत्राण गु.ह.येथील नागरिकांचे जिल्हा प्रशासनाला साकडे

By admin | Updated: December 16, 2015 23:50 IST

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.
उत्राण परिसरातील पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता ग्रामस्थांकडून स्वखर्चाने गिरणा नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधार्‍यातून खालच्या गावांना पाणी जाण्यासाठी मोठा विसर्ग आहे. या बंधार्‍यात जास्तीत जास्त एक ते दोन दिवस पाणी साठा राहत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ होत असते.
जिल्हाधिकार्‍यांनी गिरणा नदीवरील बंधारे तोडण्याचे आदेश दिल्यानंतर या बंधार्‍याच्या बाजूने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या बंधार्‍याच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून तसेच शिक्षण व व्यापारानिमित्त अन्य ठिकाणी स्थाईक झालेल्या ग्रामस्थांकडून लोकवर्गणी करीत १६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला आहे. यावर्षी पाणी टंचाईची स्थिती असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी बंधारे तोडण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने हा बंधारा तोडल्यास लाखो रुपयांचे नुकसान होऊन आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचा विचार करून उत्राण गु.ह.तील हा बंधारा कायम ठेवावा अशी मागणी सरपंच अनिल महाजन, डॉ.मगन महाजन, डॉ.भास्कर पाटील, मधुकर महाजन, सुरेश महाजन, संतोष मोरे, खंडू कोळी, सुभाष कोळी, प्रदीप भालेराव यांनी केली आहे.

कोट
जिल्हा प्रशासनाने बंधारे तोडण्यासाठी अडथळा आणणार्‍या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालेल मात्र बंधारा तोडू देणार नाही. बंधारा तोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने आमचे प्राण घ्यावे, त्यानंतर बंधारा तोडावा.
अनिल महाजन, सरपंच, उत्राण गु.ह.