शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

मुख्य अंक सिंगल

By admin | Updated: December 8, 2015 01:51 IST

दुभाजकांमधील झाडांची निगा राखावी

दुभाजकांमधील झाडांची निगा राखावी
सोलापूर: सोलापूर शहर दिवसेंदिवस विकसित होऊन स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. त्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुभाजक करण्यात आले आहेत. त्यामध्ये व रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर महापालिका, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात यावा. वृक्षारोपण केलेल्या झाडांची योग्य निगा राखली जावी. मोकाट जनावरांपासून त्याचे संरक्षण करण्यात यावे. हरित सोलापूर, स्मार्ट सोलापूर हा उपक्रम हाती घ्यावा. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र चौधरी-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन
सोलापूर: जिल्?ातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या शिष्यवृत्तीसाठी सन 2015-16 मध्ये ऑनलाईनवर ई-स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याची मुदत शासनाने 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. महाविद्यालयातील प्राचार्य, संबंधित लिपिकांनी संबंधित फॉर्म बिनचूक भरण्यासाठी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर माहिती लावावी. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज काळजीपूर्वक भरुन संबंधित महाविद्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण सोलापूर कार्यालयाचे सहायक आयुक्त नागेश चौगुले यांनी केले आहे.
जवंजाळ यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड
सोलापूर: हिप्परगा येथील हर्षवर्धन हायस्कूलचे शिक्षक संजय रामचंद्र जवंजाळ यांनी ‘धरु पर्यावरणाची कास, साधू सर्वांगीण विकास’ या विषयावर सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने या नवोपक्रमाची निवड केली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तु. ना. लोंढे, सचिव वि. रा. गरड, शं. गो. गंभीरे, उ. शं. ढेकळे यांनी कौतुक केले.
सलीमबेग मोगल यांचा सत्कार
सोलापूर: डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सलीमबेग मोगल यांचा हुतात्मा तरुण मंडळ व शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राम जाधव, गणेश अकलूजकर, कृष्णात जाधव, ललित धावणे, योगेश जगदाळे, सागर धावणे, अजिंक्य शितोळे, ओंकार धावणे, आकाश शिंदे, सागर गायकवाड, विजय गुंडे, शैलेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.