रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड मुख्य सूत्रधारच मिळेना : अनेक वेळा लावले एलसीबीने सापळे
By admin | Updated: July 16, 2016 22:38 IST
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे गावठी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसासह दीपक साईदास राठोड या अल गुन्हेगाराला पकडल्यानंतर जिल्ात रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड झाले आहे. दरम्यान, राठोड याच्या वेळीच मुसक्या आवळल्याने महामार्गावरील संभाव्य मोठी घटना टळली आहे.त्याने हे रिव्हॉल्व्हर सातपुड्यातील उमर्टी येथूनच आणल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.
रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड मुख्य सूत्रधारच मिळेना : अनेक वेळा लावले एलसीबीने सापळे
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे गावठी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसासह दीपक साईदास राठोड या अल गुन्हेगाराला पकडल्यानंतर जिल्ात रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड झाले आहे. दरम्यान, राठोड याच्या वेळीच मुसक्या आवळल्याने महामार्गावरील संभाव्य मोठी घटना टळली आहे.त्याने हे रिव्हॉल्व्हर सातपुड्यातील उमर्टी येथूनच आणल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. आठ महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या पथकाने जामनेर व पहूर येथून गावठी पिस्तुलासह आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. तेव्हाही हे पिस्तुल उमर्टी येथूनच जिल्ात आणण्यात आल्याचे उघड झाले होते. अवघ्या दहा ते पंधरा हजारात व तेही अगदी सहज हे पिस्तुल मिळत असल्याने जिल्ातील अनेक गुन्हेगार उमर्टीच्या संपर्कात आहेत. चोपडा तालुक्यातील सातपुड्यात डोंगरदरीत व मध्यप्रदेशातील टेकड्यावर उमर्टी नावाचे दोन गावे आहेत. मध्यप्रदेशात येणार्या या उमर्टीत घरोघरी गावठी पिस्तुलची निर्मिती केली जाते.तेथून जिल्ाच्या सिमेवरील उमर्टीत हे पिस्तुल आणले जातात.उमर्टी पिस्तुलचे मुख्य केंद्रदरम्यान, उमर्टी हे गावठी पिस्तुलचे मुख्य केंद्र असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक वेळा शस्त्रासह सापळा लावला, मात्र काही ना काही कारणाने ते सापळे यशस्वी झाले नाहीत. उमर्टीत जाणे तसे जोखमीचेच आहे. पुणे येथील चार जणांना पोलिसांनी जिवावर खेळून पकडले होते. त्यानंतर चाळीसगावाची ही पिस्तुलची कारवाई झाली.चौकट..अन् दीपकचा डाव उधळलादीपक राठोड हा पोलीस रेकॉर्डवरील अल गुन्हेगार आहे.त्याच्यावर चाळीसगाव पोलीस स्टेशनला जबरीचोरी, सोनसाखळी लांबविणे, हाणामारी व चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मध्यरात्री मालेगाव रस्त्यावर लूटमार अथवा जबरी चोरीचा त्याचा डाव होता, मात्र पोलिसांनी तो उधळून लावला.पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, सुरेश पवार, शरीफोद्दीन काझी, रामकृष्ण पाटील, रवींद्र घुगे, रमेश चौधरी, दिलीप येवले, विनयकुमार देसले, रवींद्र गायकवाड आदींचे पथक रात्री दहा वाजेपासून तैनात केले होते.हातात रिव्हॉल्व्हर घेऊन तो साडे अकरा वाजता रस्त्यावर आला तेव्हाच त्याला पथकाने घेरले. पोलीस असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या हाताला झटका मारुन निसटण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.